मुंबई : प्रेग्नेंसीबाबत तुम्ही ऐकलंच असेल...मात्र तुम्हाला मोलार प्रेग्नेंसी बद्दल माहिती आहे का किंवा तुम्ही याबद्दल कधी ऐकलं आहे का? गर्भधारणेच्या वेळी काही समस्या आली तर मोलार प्रेग्नेंसी होते. अर्थात मोलार प्रेग्नसी 'अॅबनॉर्मल प्रेग्नन्सी' असते. तर आज जाणून घेऊया मोलार प्रेग्नेसीबाबत
साधारणपणे सुदृढ गर्भ तयार होण्यासाठी तसंच त्याच्या उत्तम वाढीसाठी शुक्राणू बीजांडाला चिकटतो. यावेळी वडिलांच्या गुणसूत्राची एक जोडी तसंच आईच्या क्रोमोझोम्सची एक जोडी गर्भाला मिळते. यामध्येही दोन प्रकार असतात. मोलार प्रेगनंसीमध्ये गर्भाची सामान्य वाढ होत नाही. यामध्ये एखाद्या मोत्यासारख्या बुडबुड्याप्रमाणे महिलांमध्ये गर्भ तयार होतो.
मात्र मोलार प्रेग्नेंसीमध्ये वडिलांचा सुदृढ शुक्राणू आईच्या रिकाम्या बीजांडाला चिकटतो. या बिजांडामध्ये गुणसूत्र नसतात किंवा दोन शुक्राणू रिकाम्या बीजांडाला चिकटतात. अशावेळी तयार होणाऱ्या गर्भामध्ये केवळ वडिलांचे गुणसूत्र असतात मात्र आईचे नसतात. याला Complete Molar Pregnancy म्हणतात.
जेव्हा दोन शुक्राणू एका सुदृढ बीजांडाला चिकटतात अशावेळी गुणसूत्राच्या तीन जोड्या तयार होतात. अशा गर्भधारणेत कधी-कधी गर्भ वाढत असल्याची लक्षणं दिसतात. मात्र, ही गर्भधारणाही असामान्य असल्याने वाढीची लक्षणं दिसली तरी गर्भाची प्रत्यक्षरित्या योग्य पद्धतीने वाढ होत नाही.
जवळपास 1000 मध्ये एका महिलेला मोलार प्रेग्नेसीचा धोका असतो. यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. जसं की पस्तीशीनंतर आणि विशीच्या आत होणारी गर्भधारणा. मोलार प्रेग्नेसीग्रस्त असलेल्या महिलांना दुसऱ्यांना हा त्रास होण्याचा धोका अधिक असतो. 100मधील एका महिलेला मोलार प्रेग्नेसीचा त्रास दुसऱ्या वेळेस होऊ शकतो.