रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन न मिळाल्यास तातडीने काय उपाय करावेत ? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

 ऑक्सिजन आणि बेड अभावी अनेक रुग्णांनी आतापर्यंत प्राण गमावले आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था होत नाही तोपर्यंत काय करावं? 

Updated: Apr 23, 2021, 10:14 AM IST
रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन न मिळाल्यास तातडीने काय उपाय करावेत ? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. ऑक्सिजन आणि बेड अभावी अनेक रुग्णांनी आतापर्यंत प्राण गमावले आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था होत नाही तोपर्यंत काय करावं? याबाबत दिल्लीच्या गंगाराम कोव्हिड रुग्णालयातील डॉ. वेद चतुर्वेंदी (Rheumatologist) यांनी काही उपाय सांगितले आहेत. ते नक्की कोणते ते पाहूया...

काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांसाठी बेडची आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत होम हॉस्पिटलायझेशन संकल्पना महत्वाची ठरते.

होम हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय?
-  कोव्हिडचे सुक्ष्म लक्षणं असतील तर, घरी स्वतःला कमीत कमी 14 दिवस विलगीकरण करून घ्या

-घरात पल्स ऑक्सिमीटर ठेवा. आपलं ऑक्सिजन लेव्हल 94 पेक्षा कमी नाही ना. हे तपासा. 94 पेक्षा जास्त असेलतर, काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही घरीच ठिक होऊ शकता.

- पल्स ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेव्हल 94 पेक्षा खाली गेल्यास, दिवसातून 5-6  वेळा 2 तास पोटावर झोपा. यामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी होण्यास मदत होईल.

- तरीही ऑक्सिजन लेव्हल ठिक होत नसेल, तर घरी ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजन Oxygen concentrator मागवून घ्या. ऑक्सिजन सिलेंडर संपल्यास रिफिल करावा लागतो. तर Oxygen concentrator हवेतील ऑक्सिजन पुरवतो. परंतु Oxygen concentrator बाजारात जास्त किंमतीला मिळतो. 

- वरील प्रयोग करूनही ऑक्सिजन लेव्हल ठीक होत नसेलतर, सिटीस्कॅन करून घ्यावा. त्यात कोव्हिड कमी प्रमाणात आढळल्यास ऑक्सिजनचे प्रयोग सुरू ठेवा. काही दिवसात बरे वाटेल.

- सिटीस्कॅनमध्ये कोव्हिड जास्त आढळून आल्यास, रुग्णालयाची व्यवस्था करायलाच हवी. 

- सिटीस्कॅनमध्ये कोव्हिडचे प्रमाण मध्यम आढळून आल्यास, घरीच टेलिमेडिसिनची व्यवस्था करता येऊ शकते. आपल्या स्थानिक तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून योग्य स्टेरॉईड औषधं घेऊन बरे होता येईल.

- तरीही बरे वाटत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टेरॉइडचे इंजेक्शन आणि रेमडेसिवीरचे इंजेक्शन घेऊन या आजारापासून स्वतःचा बचाव करता येईल. 

कोव्हिड पासून स्वतःच्या बजावासाठी आनंदी रहा. योग्य आहार घ्या, भरपूर व्यायाम करा. मास्क वापरा,  सॅनिटाय़झरचा वापर करा.

(वरील कोणतेही प्रयोग करण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला  घ्या, हा लेख तज्ज्ञांकडून मिळालेल्या सामान्य माहितीच्या आधारवर आहे)