मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहणं फार गरजेचे आहे. खरंतर, ऑफिसचा वेळ जास्त असल्याने स्वत:ला निरोगी ठेवणे कठीण आहे. यात काही लोक त्यांच्या रूटीनमध्ये व्यायाम करतात. खूप लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात. पण, खरंतर हे समोर आलं आहे की, ज्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात, त्यांना याचा काही फायदा नाही होत नाही, त्याचे कारणही समोर आले आहे.
जेव्हा वजन कमी करण्यासाठी आपण नवीन लाइफस्टाईलची सुरवात करतो, तर त्यात कळत- नकळत आपण खूप बदल करतो. काही वेळा त्याचा उलट परिणाम होतो. अभ्यासानुसार व्यायाम करणारे लोक गरजेपेक्षा जास्त खाण्यास सुरवात करतात, किंवा व्यायामाच्या नावावर दुसऱ्या गोष्टी करणे टाळतात. अशात त्यांचं वजन कमी होत नाही.
यासाठी एक रिसर्च करण्यात आला, या अभ्यासात अशा लोकांना घेतले जे व्यायाम करत नाहीत. अभ्यासादरम्यान त्यांच्या कंबरेच्या मापावर लक्ष ठेवण्यात आले. त्यातल्या काही लोकांना त्यांची नॉर्मल लाइफस्टाईल चालू ठेवण्यास सांगितली. दुसरीकडे बाकीच्यांना व्यायाम करण्यास सांगितले. व्यायाम करणाऱ्यांनाही दोन गटांमध्ये विभागण्यात आले. एका गटाला आठवड्यात ७०० कॅलरिज कमी करायच्या होत्या आणि दुसऱ्या गटाला १ हजार ७६० कॅलरिज.
व्यायाम करणारे आणि न करणारे यांच्यात फारसा फरक दिसून आला नाही. व्यायाम करणाऱ्या गटातील लोकांचं जेवढं वजन घटायला पाहिजे होतं, त्यापेक्षा त्यांचं वजन कमी घटलं. यात कॅलरीज बर्न केल्याचा काहीही फायदा झाला नाही. उलट वर्कआऊट केल्याने दिवसभरातील त्यांचं चालणं फिरणंही कमी झालं.
दुसरीकडे व्यायाम करणाऱ्या दोन्ही गटात ठरवल्यापेक्षा कमी वजन कमी झाले. व्यायाम करणाऱ्यांनी जास्त खाण्यास सुरवात केली. त्यामुळे बर्न केलेल्या कॅलरिजचा काही फायदा झाला नाही. उलट त्यांनी नेहमी पेक्षा चालणे-फिरणे कमी केले. कारण आपण व्यायाम करतो असा त्यांचा समज झाला.