World Milk day - दूध गरम प्यावे की थंडगार?

दूधाला पूर्ण अन्न मानलं जातं. बाळाचा जन्म झाल्यनंतर त्याला पहिल्यांदा आईचं दूध दिले जाते. 

Updated: Jun 1, 2018, 03:26 PM IST
World Milk day -  दूध गरम प्यावे की थंडगार? title=

मुंबई : दूधाला पूर्ण अन्न मानलं जातं. बाळाचा जन्म झाल्यनंतर त्याला पहिल्यांदा आईचं दूध दिले जाते. दूधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटामिन डी हे घटक आढळतात. आवडीनुसार काही जण गरम किंवा थंड दूध पितात. पण यापैकी नेमका आरोग्यदायी मार्ग कोणता? हा प्रश्न तुमच्याही मनात रेंगाळतोय ना.. मग या एक्सपर्ट सल्ल्याने जाणून घ्या दूध कोणत्या पद्धतीने पिणं आरोग्याला अधिक फायदेशीर ठरते.  

लॅक्टोजचा त्रास होत नसल्यास गरम दूध प्यावे – 

गरम दूध पचायला हलके असते. थंड दूध प्यायचे झाल्यास त्यात सिरेल्स, कॉर्नफ्लेक्स मिसळून खावे. मात्र लॅक्टोजचा त्रास होत असल्यास, दुग्धजन्य पदार्थ  पचण्यास त्रास होत असेल तेव्हा थंड दूध पिणे टाळा. दूध उकळल्याने त्यातील लॅक्टोजचे विघटन होते त्यामुळे गरम दूध पिणे हा उत्तम मार्ग आहे. अन्यथा पचनाचा त्रास झाल्याने ब्लोटींग / पोटफुगीचा किंवा डायरियाचा त्रास होऊ शकतो. 

ग्लासभर गरम दूध प्यायल्याने झोप चांगली येते – 

झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम दूध प्यायल्याने शांत झोप मिळण्यास मदत होते. दूधातील अमिनो अ‍ॅसिड सेरोटोनीन आणि मेलाटोनीन या झोप  प्रवृत्त करणार्‍या केमिकल्सची निर्मिती करण्यास मदत करतात. यामुळे शरीर शांत व आरामदायी बनते. 

पित्त कमी करण्यास थंड दूध प्रभावी  – 

पित्तामुळे पोटात होणारी जळजळ कमी करण्यास थंड दूध मदत करते. नियमित जेवणानंतर अर्धा ग्लास थंड दूध प्यायल्यास शरीरात निर्माण होणारे पित्त रोखण्यास मदत होते. WorldMilkDay: थंड दूध पिण्याचे हे आहेत फायदे

डीहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी थंड दूध उत्तम  – 

ग्लासभर थंड दूध प्यायल्याने डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते. सकाळी नाश्त्याच्यावेळी थंड दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते. मात्र सर्दी-पडशाचा त्रास होत असल्यास थंड दूध पिणे टाळा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x