Yellow Nails : हाताची नखं झालीत पिवळी 'हे' घरगुती उपाय वापरल्यास नक्कीच होईल फायदा

Yellow Nails पासून आहात त्रस्त? तर जाणून घ्या हे घरगुती उपाय नक्कीच होईल फायदा...

Updated: Jan 27, 2023, 06:42 PM IST
Yellow Nails : हाताची नखं झालीत पिवळी 'हे' घरगुती उपाय वापरल्यास नक्कीच होईल फायदा title=

Yellow Nails: आजकाल अशी एक व्यक्ती नाही जी स्वत: कडे लक्ष देत नाही. आपण कसे दिसते याकडे प्रत्येक व्यक्ती लक्ष देते. आपला चेहरा नीट आहे ना कपडे नीट आहेत ना पर्यंत सगळ्याच गोष्टी. पण या सगळ्यात महत्तावची गोष्ट म्हणजे आपली नखं. त्यांच्या स्वच्छतेकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. नखे हे कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व सांगतात, त्यामुळे त्याची स्वच्छता राखणे अत्यंत महत्वाचे असते. कारण जर आपली नखं पण पिवळं आणि घाणेरडे असतील तर तुमचं सर्वांवर खूप घाणेरडे एक्सप्रेशन पडते. नखे सहज घरगुती साधनांच्या मदतीने कशा प्रकारे उजळता येतील हे तुम्हाला माहीत आहे का?

आजकालचा मुली नेल पेंटच्या मदतीने नखे सुंदर करतात, परंतु मुले शरीराच्या या भागाकडे फारसे लक्ष देत नाहीत, त्यामुळे नखांमध्ये घाण साचते आणि ते पिवळे दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला ते उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

नखे स्वच्छ करण्याच्या घरगुती टिप्स

1. लिंबाचा रस आणि मीठ यांचे एकत्रित मिश्रण करून ब्रशच्या मदतीने नखांवर चोळा, यामुळे नखांचे डाग दूर होतील.

2.  लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण देखील नखांवरचे डाग नाहीसे करायला मदत करतात.  

3. दररोज सकाळी दात स्वच्छ करण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर करतो, परंतु खूप कमी लोकांना माहित असेल की त्यात असलेले पेरोक्साईड नखांचे डाग देखील दूर करायला मदत करते.

4. लसणामध्ये `अँटी-फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे आपली नखे साफ करण्यास मदत होते. यासाठी तुम्ही लसणाची पेस्ट देखील वापरू शकता किंवा एक लसून तुमच्या नखाला घासा. 

हेही वाचा : Hrithik Roshan ते स्वप्निल जोशी, सई ताम्हणकरपर्यंत या सिने कलाकारांविरुद्ध गुन्हे दाखल होणार?

5. नखांवरचे पिवळे डाग काढून टाकण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा देखील वापर करू शकतात. यामुळे नक्कीच तुमची नखं चमकतील. 

6. नारळाते तेल बहुतेक वेळा आपण केस आणि त्वचेसाठी वापरतो. पण तुम्ही हे तेल जर गरम करून त्याने नखांवर मसाज केली तर नखांना नक्कीचफायदा होईल आणि त्याचा पिवळेपणा निघून जाईल.

7. आपली नखे थोड्या वेळासाठी लिंबाच्या रसामध्ये बुडवून ठेवा आणि नंतर घाण साफ करण्यासाठी मऊ ब्रशने नखांना घासून घ्या, नखांना सुंदर चमक येईल. परंतु एक काळजी घ्या की ब्रशने साफ करताना नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला इजा पोहोचणार नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)