Ncp On Bollywood and Marathi Actors : तंत्रज्ञानात होणारी प्रगती ही मोबाइल्समध्ये होत असल्याचं आपण पाहतोच आहोत. गेल्या काही वर्षात मोबाइलचे रॅम आणि HD ग्राफिक्स यामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वीच्या मोबाइलच्या तुलनेत आत्ताचे मोबाइल हे हाय एन्ड मोबाइल गेम्सना सपोर्ट करतात. मोबाइलवर गेम खेळणं हा लाखो मोबाइल धारकांचा आवडता छंद आहे. आता घर बसल्या गेम खेळण्यास सगळी पसंती देतात. सध्याच्या घडीला प्रत्येक फोनवर आपण विविध गेम्स खेळता येतात. त्यापैकी एक लोकप्रिय खेळ म्हणजे रम्मी. दरम्यान, राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ऑनलाईन रम्मी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या जाहिरातींतील हिंदी आणि मराठी क्षेत्रातील चित्रपट कलाकारांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका पत्रात मराठी अभिनेता स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, अमेय वाघ, अंकुश चौधरी, उमेश कामत, संतोष जुवेकर, अभिनेत्री सई ताम्हणकर, श्रुती मराठे, अमृता खानविलकर आणि गौली नलवडे यासारख्या कलाकारांची नावं घेतली आहेत. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता मनोज वाजपेयी, हृतिक रोशन, शक्ती कपूर, आलोक नाथ, रजा मुराद, अनुप सोनी, अली असगर, अन्नू कपूर आणि शिशिर शर्मा यांचे नावं आहेत.
या कलाकरांची नावं घेताना राष्ट्रवादीनं म्हटलं की, महाराष्ट्रात मटका किंवा पत्ते खेळण्यावर बंदी आहे. एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचे खेळ खेळताना कोणी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र ऑनलाईन रम्मीमधून सर्रास महाराष्ट्रात अवैध धंदा सुरु आहे. या धंद्याला जाहिरात करत मराठी आणि हिंदी कलाकार जाहिरात करत रम्मी खेळण्यास प्रवृत्त करत आहेत. हे मराठी कलाकार आपल्या कुटुंबातील लोकांना रम्मी सारखे असे खेळ खेळण्यास प्रोत्साहित केलं असतं का? असा प्रश्न कलाकारांना केला आहे.
हेही वाचा : Sidharth Shukla याने Shehnaaz Gill च्या कुशीत घेतला होता अखेरचा श्वास, त्यानंतर...
पत्रात पुढे म्हटले आहे की, काही नामांकित मराठी आणि हिंदी कलाकारांनी समाजावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून दारू, गुटखा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही जाहिराती नाकारल्या आहेत, ज्याने समाजाचं स्वास्थ खराब होईल. अशा कलाकारांचं सुद्धा कौतुक आम्ही करतोच. मात्र जे कलाकार फक्त पैसे कमवण्याच्या उद्देशाने समाजस्वास्थ्य बिघडवत असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन शिक्षा होणंही महत्त्वाचं आहे, असं या पत्रामध्ये बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.