इनकम टॅक्स संदर्भातील 'हे' 10 नियम 1 एप्रिलपासून बदलणार

2018 -19 या आर्थिक वर्षात नवे बदल होणार आहेत. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 14, 2018, 12:15 PM IST
इनकम टॅक्स संदर्भातील 'हे' 10 नियम 1 एप्रिलपासून बदलणार  title=

मुंबई : 2018 -19 या आर्थिक वर्षात नवे बदल होणार आहेत. 

हे बदल करांशी संबंधित असल्यामुळे सामान्य माणसावर याचा मोठा परिणाम होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरूण जेटलींनी अर्थसंकल्पात दिलेल्या माहितीनुसार टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नसला तरीही अन्य काही महत्वाचे बदल या अर्थसंकल्पात करण्यात आले आहेत. 

इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये होणार बदल 

1) पेंशनधारक आणि नोकरदार वर्गाला 40 हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन देण्यात आळं आहे. तसेच 19,200 रुपये वाहतूक भत्ता आणि 15 हजार रुपयांची मिळणार वैद्यकीय भत्ता बंद करण्यात आला आहे 

2) आता टॅक्सपेयर्सच्या उत्पन्नाच्या टॅक्सवरील सेस चार टक्के करण्यात आला आहे. या आधी हा सेस 3 टक्के होता. आता चार टक्के आरोग्य आणि शिक्षणाला टॅक्स देण्यात आला आहे. 

3) म्चुअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलीत : शेअर्स किंवा म्युचल फंडात एक वर्ष किंवा त्याहून आधिक काळ केलेल्या गुंतवणूकीवर आता टॅक्स भरावा लागणार आहे. गुंतवणूकीतून एक लाख रुपयांपेक्षा आधिक नफा असेल तर त्यावर 10 टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. 31 जानेवारी 2018 पर्यंत मिळालेला नफावर टॅक्स लागणार नाही पण एक फेब्रुवारीपासून त्यावर टॅक्स सुरु होईल. 

4) नॅशनल पेंशन सिस्टममधली जमा झालेली रक्कम काढल्यानंतर त्यावरील टॅक्ससूटसाठी आता माजी कर्मचारी देखील क्लेम करू शकतात. 

5) ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्यावर 50 हजारापर्यंतची करसवलत देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे पोस्टात किंवा बँकमध्ये जमा केलेल्या पैशावर 50 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या व्याजाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. 

6) काही विशिष्ट प्रकारच्या रोगांवर उपचारासाठी लागलेल्या खर्चावरील टॅक्स सूटची मर्यादा एक लाख रुपये केली आहे. याआधी 80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिंकांसाठी 80000 रुपये आणि  60 ते 80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना 60  हजार रुपयांवरील खर्चा टॅक्स फ्री होता

7) 25 हजार रुपयापर्यंतच्या टॅक्स डिडक्शन क्लेमची मर्यादा वाढवून दोन वर्ष केली आहे. दोन वर्ष जर एखादी विमा कंपनीमध्ये 40 हजार रुपये जमा करत असेल आणि त्यावर ती कंपनी तुम्हाला 10 टक्के सलवत देत असेल तर तुम्ही दोन वर्ष प्रत्येकी 20 हजार रुपये टॅक्स डिडक्शन क्लेम करु शकता. 

8) ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य विम्यावर 50 हजारापर्यंतची करसवलत देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे पोस्टात किंवा बँकमध्ये जमा केलेल्या पैशावर 50 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या व्याजाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. 

9) इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन  80 टीटीबीनुसार आता ज्येष्ठ नागरिकांच्या  FDs आणि RDsवर मिळालेलं व्याज आता टॅक्स फ्री असणार आहे. 

10) प्रधानमंत्री वय वंदना योजनेनुसार गुंतवणूकीची मर्यादा 7.5 लाखावरुन 15 लाख करण्यात आली आबे. याध्ये जमा असेलेल्या पैशावर 8 टक्के व्याज मिळणार आहे.