VIDEO: १२ वर्षांच्या मुलाने एसबीआयच्या ब्रांचमधून चोरले ३ लाख रुपये

उत्तर प्रदेशच्या रामपूरस्थित एसबीआयच्या ब्रांचमधून तीन लाख रुपये चोरी केल्याची घटना घडलीये. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ही चोरी १२ वर्षाच्या मुलाने केलीये. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

archana harmalkar Updated: Mar 17, 2018, 09:34 AM IST
VIDEO: १२ वर्षांच्या मुलाने एसबीआयच्या ब्रांचमधून चोरले ३ लाख रुपये title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या रामपूरस्थित एसबीआयच्या ब्रांचमधून तीन लाख रुपये चोरी केल्याची घटना घडलीये. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ही चोरी १२ वर्षाच्या मुलाने केलीये. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

पोलिसांनी जेव्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा हा मुलगा पैशाने भरलेली बॅग बाहेर घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केलाय. तसेच या आरोपी मुलाचाही तपास सुरु आहे.

सीसीटीव्हीमध्ये घटना झाली कैद

सीसीटीव्हीमध्ये लाल आणि काळ्या रंगाचा टीशर्ट घातलेला मुलगा दिसतोय.यावेळी बँक कर्मचाऱ्यांसह इतर लोकही तेथे उपस्थित होते. यादरम्यान मुलगा संधी मिळताच हिरव्या रंगाची बॅग उचलतो आणि वेगाने पळ काढतो. मात्र त्याचा कोणीही पाठलाग करताना दिसत नाहीये.

पोलिसांनी सुरु केला तपास

पैशाने भरलेली बॅग चोरीला गेल्यानंतर बँकेत एकच कल्लोळ झाला. याप्रकरणी तातडीने स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी बँकेच्या ब्रांचमध्ये जात सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा सारेच हैराण जाले. लाखो रुपयांची चोरी एका १२ वर्षाच्या मुलाने केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसतेय.

या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.