14 Years Old Suicide: मम्मी मला माफ कर, अशी चिठ्ठी लिहून एका 14 वर्षीय मुलीने गळफास घेत आपलं जीवन संपवले आहे. एकुलत्या एका लेकीच्या मृत्यूमुळं आई-वडिलांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. आई- वडिल घरात येताच मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे.
उत्तर प्रदेशमधील बांदा येथे एका 14 वर्षांच्या मुलीने गळफास घेतला आहे. आई-वडिल बँकेत गेले असताना तिने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. तिच्या पालकांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना एक सुसाइड नोटदेखील मिळाली आहे.
पोलिसांना मुलीच्या मृतदेहाशेजारीच एक सुसाइड नोट मिळाली आहे. 'अब हम न रहेंगे, न तो किसी से बोलेंगे. हम किसी की वजह से अपनी जान नहीं दे रहे. मुझे माफ कर देना मेरी प्यारी मम्मी' असं तिने म्हटलं आहे. तसंच, चिठ्ठीवरुन तिने कोणाच्याही दबावाखाली येऊन आत्महत्या केली नसल्याचा अंदाज येत आहे. चिठ्ठीत कोणाचे नाव न लिहल्यामुळं यामागे घातपात आहे का याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिस मयत तरुणीच्या मोबाईल फोनची तपासणी करत आहेत. तसंच, सीडीआर डिटेलही काढण्यात येणार आहे. जेणेकरुन मुलीने आत्महत्येसारखे मोठे पाऊल का उचललं, याचा शोध घेता येईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संतराम येथे राहणाऱ्या धीरेंद्र आणि त्यांची पत्नी बँकेत गेले होते. घरी त्यांची 14 वर्षांची मुलगी एकटी होती. बँकेतील काम आटोपण्यास त्यांना उशीर झाला होता. पण बँकेतील काम संपवून घरी जाताच त्यांनी पाहिले की त्यांच्या एकुलत्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलीला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे.
मयत 14 वर्षांची अल्पवयीन मुलगी 9वीच्या वर्गात शिकत होती. तिचे वडिल धीरेंद्र मजूरी करुन घर चालवतात. मुलीच्या मृत्यनंतर त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. मुलीची आई सतत तिची आठवण काढून रडते आहे. मुलीने आत्महत्या का केली, याचे कारण तिच्या आई-वडिलांना देखील ठावूक नाहीये.
पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून परिसरात चौकशी करत आहेत. तसंच, तिच्या शाळेतील काही मित्र- मैत्रिणींचीही चौकशी करण्यात येत आहे. छोट्या-छोट्या गोष्टींचा तपास करुन मुलीने आत्महत्या का केली असावी, याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.