मुंबईतील लाजीरवाणी घटना | एका रात्रीत, ३ ठिकाणी अल्पवयीन मुलीवर ३ वेळेस बलात्कार

या घटनेशी संबंधीत चार आरोपींना अटक झाली आहे, परंतु दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे.

Updated: Jun 6, 2021, 10:27 PM IST
मुंबईतील लाजीरवाणी घटना | एका रात्रीत, ३ ठिकाणी अल्पवयीन मुलीवर ३ वेळेस बलात्कार

मुंबई (मालाड) : महाराष्ट्रातील राजधानी मुंबईमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 3 वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेशी संबंधीत चार आरोपींना अटक झाली आहे, परंतु दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे.

आपली मुलगी घरी आली नाही म्हणून 31 मे आणि 1 जूनच्या रात्री मुलीच्या घरच्यांना मालाड पोलिस स्टेशनमध्ये मुलगी गायब असल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास घ्यायला सुरवात केला. पंरतु ती मुलगी काही सापडली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी ती मुलगी स्वत: घरी आली. त्यावेळेस ती अत्यंत घाबरलेली आणि थकलेली दिसत होती.

घरी आल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता, तिने काहीही सांगितले नाही. नंतर महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मुलीची विचारपूस करण्यास सुरवात केली. पहिले तर ती मुलगी काहीही बोलली नाही. थोड्या वेळाने तिने सगळी घटना महिला आधिकाऱ्यांना सांगितली. ती घटना ऐकल्यानंतर उपस्थित सगळ्याच लोकांना धक्का बसला.

मुलीने नक्की काय सांगितले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचे इंस्टाग्रामवर काही मित्र झाले होते. त्यापैकी एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते सगळे मित्र मढ जवळच्या एका हॉटेल बाहेल भेटले होते. त्यांच्यापैकी एका मित्राने कार आणली होती. त्यामुळे त्यांनी त्या कारवरच केक कापला. त्यानंतर त्यापैकी दोन जणांनी त्यामुलीला कारमध्ये बसवले आणि त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर या लोकांना त्यांच्या आणखी एका मित्राच्या घरी या मुलीला सोडले. जेथे तिच्यावर आणखी एकदा बलात्कार झाला. तिथू निघाल्यानंतर घरी न जाता ही मुलगी तिच्या एका मित्राच्या घरी गेले. तिथे ही तिच्यावरती बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ती मुलगी तिथून कशी बशी आपल्या घरी पोहचली.

पोलिसांनी सांगितले की, हे सगळे आरोपी 18 ते 23 वर्षाचे आहेत आणि हे सगळे इंस्टाग्रामवरील मित्र आहे. तेथेच त्यांची भेट झाली आहे. यामध्ये 4 आरोपींना अटक झालेली आहे आणि दोन आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी पुढे हे ही सांगितले की, या फरार आरोपींनी त्या मुलीवर बलात्कार केला नाही, पंरतु ही घटना घडत असताना ते देखील तेथे उपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.