मुंबई : तुमच्याकडे जर जुनी नाणी आहेत किंवा तुम्हाला ती नाणी जमवायचा छंद आहे. तर, तुम्हाला ही नाणी एकाच फटक्यात लक्षाधीश बनवू शकतात.
अर्थातच, अनेकांचा या गोष्टीवर विश्वास नाही बसरणार. कारण, आजच्या महागाईच्या जमान्यात 100 रूपयांच्या नोटीचे मोल नाही राहिले. तर, 2 रूपयांच्या नाण्यांचे काय कौतूक. पण, सविस्तर जाणून घ्याल तर, तुम्हाला सर्व प्रकार समजेल. नाणी तर, तशी प्रतिवर्ष बनवली जातात. टकसाळात तेच तर, काम चालते. पण, मालामाल करून देणाऱ्या नाण्यांमध्ये 1980च्या दशकात बनवलेली. नाणी विशेष लोकप्रिय आहेत. काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये झालेल्या एका लिलावामध्ये 2 रूपयांचे एक नाणे चक्क 3 लाख रूपयांना विकत घेतले गेले. हैदराबादच्या आर्ट गॅलरीत झालेल्या या विक्रीमुळे एक व्यक्ती चक्क एका रात्रीत लक्षाधीश बनला.
मुंबईतील टकसाळात बनविण्यात आलेल्या नाण्यांच्या अशा लिलावामध्ये विशेष मागणी असल्याचेही पुढे आले आहे. मुंबईते बनविण्यात आलेल्या नाण्यांवर डायमंडची एक निशाणी असते. तुमच्याकडेही अशी नाणी असल्यास त्यास अनेक खरेदीदार मिळू शकतात.
या नाण्यांची विक्री खास करून ऑनलाईन मार्केटमध्ये जोरदार आहे. सुरूवातीच्या काही काळात क्विकर बेबसाईटवर विकली जाणारी ही नाणी आता ओएलएक्सवरही विक्रीसाठी आल्याचे पहायला मिळते. तुम्ही सुद्धा ऑनलाईन मार्केटचा वापर करत आपली नाणी विकू शकता. ऑनलाईन मार्केटवर नाण्यांचा लिलावही होतो. तुम्हीही यात भाग घेऊन श्रीमंतीच्या रस्त्यावर आगेकूच करू शकता.