नवी दिल्ली: 'वाघ वाचवा' हे अभियान देशभरात जोरात सुरू आहे. मात्र, ते केवळ जाहिरातबाजीच आहे का?, असा सावाल निर्माण झाला आहे. कारण गेल्या दोन वर्षात देशभरातून तब्बल २३७ वाघांची हत्या करण्यात आल्याचे आकडेवारी सांगते. स्वत: केंद्र सरकारनेच लोकसभेत ही माहिती गुरूवारी दिली.
लोकसभेत माहिती देताना सरकारने सांगितले की, २०१२ ते २०१७ पर्यंत २३ वाघ हे शिकार किंवा बेकायदेशीर मार्गाने मारण्यात आले. तर, ५५ टक्के वाघ हे नैसर्गिक किंवा इतर कारणांनी मृत्यू पावले. पर्यावरणमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले की, ७ टक्के वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूंचे कारण हे शिकार नव्हे. मात्र, ट्रॅफिक, अपघात, किंवा मानव- व्यन्यजीव यांच्यातील संघर्ष आदी गोष्टींमुळे झाला आहे.
दरम्यान, उर्वरीत १६ टक्के प्रकरणांमध्ये प्रशासनाला केवळ मृत वाघांची शरीर मिळाली आहेत. त्यात हे सांगता येत नाही की, या वाघांचा मृत्यू हा शिकारीच्या कारणामुळेच झाला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मृत पावलेल्या वाघांची नोंद करण्यासाठी वेगळी श्रेणी ठेवली आहे.