सोने दरात घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा भाव

जाणून घ्या काय आहेत, सोन्या-चांदीचे दर...

Updated: Sep 25, 2020, 01:46 PM IST
सोने दरात घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा भाव
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्याच्या दरात सतत घसरण होत असल्याने, जवळपास महिन्यांनंतर सोन्याचा भाव 50 हजारांच्या खाली आला आहे. गुरुवारी 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह सोन्याचा दर 49,428 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 485 रुपयांनी कमी होऊन 50,418 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, सलग चौथ्या व्यापार सत्रात सोन्याच्या दरात घसरला आहे. बुधवारी सोन्याचा व्यापार 50,903 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीच्या दरात 2081 रुपयांची घसरण होत तो 58,099 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला होता. 

एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं की, युरोपमध्ये वाढत्या कोरोना संसर्गामुळे सर्वसाधारण आर्थिक मंदीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे. 

गेल्या महिन्यात 8 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर 56,200 रुपये 10 ग्रॅमवर पोहचला होता. तर चांदीचा भाव 68000 रुपये किलोग्रॅम इतका झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सध्या सोन्या-चांदीचे दरात घसरण झाली आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने भारतीय बाजारात सोन्याचे दर वाढले असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 

जगभरातील आर्थिक गोष्टींबाबतच्या नकारात्मक गोष्टी आणि चीन-अमरिका यांच्यातील व्यापर युद्ध, हे जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढण्याचं मुख्य कारण ठरलं असल्याची यासंबंधी जाणकारांची माहिती आहे.