तिहेरी तलाक बिलमध्ये मोदी सरकारकडून ३ मोठे बदल

आज लोकसभेत तिहेरी तलाक बिलवर चर्चा होणार आहे.

Updated: Dec 27, 2018, 01:29 PM IST
तिहेरी तलाक बिलमध्ये मोदी सरकारकडून ३ मोठे बदल title=

नवी दिल्ली : आज लोकसभेत तिहेरी तलाक बिलवर चर्चा होणार आहे. केंद्र सरकारने या बिलमध्ये संशोधन केलं आहे. त्यानंतर सरकार आणि विरोधी पक्षामध्ये चर्चेसाठी सहमती झाली आहे. भाजप आणि काँग्रसेने आपल्या खासदारांना चर्चेच्या वेळी उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी म्हटलं की, 'सरकारने धार्मिक प्रकरणात पडू नये.'

मोदी सरकारने तिहेरी तलाक बिल मागच्या वर्षीच लोकसभेत मांडलं होतं. पण हे बिल राज्यसभेत पास होऊ शकलं नव्हतं. पुन्हा एकदा हे बिल मोदी सरकार ३ बदल केल्यानंतर संसदेत मांडणार आहे. मागील आठवड्यात यावर चर्चा होऊन ते पास केलं जाणार होतं पण काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाने त्यावर २७ डिसेंबरला चर्चा ठेवण्याची विनंती केली होती.

काय आहेत ३ बदल

पहिला बदल

आधी- या प्रकरणात आधी कोणीही तक्रार नोंदवू शकत होतं .
आता - या प्रकरणात आता फक्त पीडित महिला, तिचे नातेवाईक तक्रार दाखल करु शकतात.

दुसरा बदल

आधी - या प्रकरणात आधी अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार होता. याआधी पोलीस बिना वॉरंटचे आरोपीला अटक करु शकत होती.
आता - न्यायाधीशाला जामीन देण्याचा अधिकार

तिसरा बदल

आधी - याआधी तडजोडीची कोणतीही तरतूद नव्हती.
आता - न्यायाधीशासमोर पती-पत्नीमध्ये तडजोडीचा पर्याय उपलब्ध आहे.