हरियाणामध्ये सरकार स्थापनेसाठी हे आहेत 3 पर्याय

कोण होणार हरियाणाचा मुख्यमंत्री...?

Updated: Oct 24, 2019, 10:03 PM IST
हरियाणामध्ये सरकार स्थापनेसाठी हे आहेत 3 पर्याय title=

नवी दिल्ली : किंगमेकरच्या भूमिकेत असणारे जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला शुक्रवारी बैठक घेऊन त्यांचा पुढचा निर्णय घेणार आहेत. हरियाणामध्ये भाजपने 75 दावांवर दावा केला होता. पण तसं झालं नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांना कोणाला तरी सोबत घ्यावं लागणार आहे. जननायक जनता पक्ष कोणाला समर्थन देणार यावरुन हरियाणामध्ये सरकार स्थापन होणार आहे. काँग्रेस दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्रीपद देण्यासाठी तयार आहेत. पण त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

सत्तास्थापनेचा पर्याय

1. भाजप आणि अपक्ष

भाजप 40 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी भाजपला 6 जागांची गरज आहे. अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देऊ शकतात. भाजपमधून बंडखोरी केलेले अनेक नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण अशा आमदारांना पुन्हा पक्षात घेतलं जावू शकतं. त्यानंतर मनोहर लाल खट्टर पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यामुळे या अपक्ष आमदारांचा भाव आता चांगलाच वाढणार आहे.

2. काँग्रेस-जेजेपी-इतर

काँग्रेसकडे 30 जागा आहेत तर जेजेपीकडे 10 जागा आहेत. त्यामुळे हे दोघे एकत्र आले तरी त्यांना देखील 6 जागांची गरज भासणार आहे. त्यामुळे त्यांना देखील अपक्ष आमदारांशिवाय पर्याय असणार नाही. अपक्ष 10 आमदारांमध्ये 6 आमदार हे भाजपचे बंडखोर आहेत. त्यामुळे ते काँग्रेस सोबत जाणार का हा मोठा प्रश्न आहे.

3. भाजप आणि जेजेपी

जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला हे भाजपला पाठिंबा देतात तर भाजपचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. पण भाजप दुष्यंत चौटाला यांना मुख्यमंत्रीद देणार नाहीत. पण त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जावू शकतं. त्यामुळे दुष्यंत चौटाला यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.