नीरव मोदी आणि माल्याच नाही तर हे ३१ व्यापारी झाले परदेशात फरार, वाचा संपूर्ण लिस्ट

  परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसीसह ३१ व्यापारी सीबीआयशी संबंधीत प्रकरणात परदेशात फरार झाले आहेत. विजय माल्या, आशीष जोबनपूत्र, पुष्पेश कुमार वैद्य, संजय कालरा, वर्षा कालरा आणि आरती कालरा यांच्या प्रत्यार्पणासंबंधीची विनंती सीबीआयने केली केल्याचे अकबर यांनी यांनी सांगितले आहे. या विनंतीला संबंधीत देशांकडे पाठविण्यात आली आहे. सन्नी कालरा संदर्भातील प्रत्यार्पणासंबंधी सीबीआयच्या आग्रहावर परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे. 

प्रशांत जाधव | Updated: Mar 14, 2018, 08:38 PM IST
नीरव मोदी आणि माल्याच नाही तर हे ३१ व्यापारी झाले परदेशात फरार, वाचा संपूर्ण लिस्ट title=

नवी दिल्ली :  परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसीसह ३१ व्यापारी सीबीआयशी संबंधीत प्रकरणात परदेशात फरार झाले आहेत. विजय माल्या, आशीष जोबनपूत्र, पुष्पेश कुमार वैद्य, संजय कालरा, वर्षा कालरा आणि आरती कालरा यांच्या प्रत्यार्पणासंबंधीची विनंती सीबीआयने केली केल्याचे अकबर यांनी यांनी सांगितले आहे. या विनंतीला संबंधीत देशांकडे पाठविण्यात आली आहे. सन्नी कालरा संदर्भातील प्रत्यार्पणासंबंधी सीबीआयच्या आग्रहावर परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे. 

ही आहे परदेशात फरार व्यक्तींची यादी...

लोकसभेत मो. मो. बदरूद्दोजा खान, कौशल किशोर, मोहम्मद सलीम आणि रामदास तडस यांनी परदेशात फरार झालेल्या व्यापाऱ्यांची यादी मागितली होती. त्यानुसार अकबन यांनी सीबीआयची यादी सादर केली. सीबीआय संबंधी प्रकरणात परदेशात फरार झालेल्या व्यापाऱ्यांमध्ये विजय माल्या, सौमित जेना, विजय कुमार रेवा भाई पटेल, सुनील रमेश रूपाणी, पुष्पेश कुमार वैद्य, सुरेंद्र सिंह, अंगद सिंह, हरसाहिब सिंह, हरलीन कौर, अशीष जोबनपुत्र, जतीन मेहता, नीरव मोदी, नीशल मोदी, अमी नीरव मोदी, मेहुल चोकसी, चेतन जयंतीलाल संदेशरा, दीप्ति चेतन संदेशरा, नीतीन जयंतीलाल संदेशरा, सभ्य सेठ, नीलेश पारिख, उमेश पारिख, सन्नी कालरा, आरती कालरा, संजय कालरा, वर्षा कालरा, हेमंत गांधी, इश्वर भाई भट, एम जी चंद्रशेखर, चेरिया वी सुधीर, नौशा कादीजथ आणि  चेरिया वी सादिक यांच्या समावेश आहे.