कोईम्बतूरमध्ये साजरी केली लिट्टेचा प्रमुख प्रभाकरनची जयंती

तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये साजरऱ्या करण्यात आलेल्या एका जयंतीमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या. ही जयंती होती लिबरेशन टायगर तामिळ ईलमचा(लिट्टे) प्रमुख दिवंगत नेता वेल्लुपिल्लई प्रभाकरन याची.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 26, 2017, 06:34 PM IST
कोईम्बतूरमध्ये साजरी केली लिट्टेचा प्रमुख प्रभाकरनची जयंती title=

चेन्नई : तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये साजरऱ्या करण्यात आलेल्या एका जयंतीमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या. ही जयंती होती लिबरेशन टायगर तामिळ ईलमचा(लिट्टे) प्रमुख दिवंगत नेता वेल्लुपिल्लई प्रभाकरन याची.

थंथई पेरियार कझगम (TPDK) पक्षाने प्रभाकरन याची 63वी जयंती शनिवारी साजरी केली. प्रभाकरन याची जयंती साजरी केल्यामुळे तामिळनाडू राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजू शकते. गेल्या वर्षी श्रीलंकेतील तामिळ बहूल जाफना शहरातील एका विद्यापीठातही प्रभाकरन याची जयंती साजरी करण्यात आली होती. जाफना विद्यापीठात शेकडो विद्यार्थी, व्यवस्थापनातील अधिकारी तसेच, अनेक नागरिकांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यात आली होती. ही जयंती विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात केक कापून वाढदिवस साजरा केला होता.

दरम्यान, श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व परिसरात वेगळ्या तमीळ राज्यासाठी प्रभाकरन यांने लिट्टेची स्थापना केली होती. सुमारे 3 दशकं श्रीलंकेत या मुद्यावरून गृहकलह सुरू होता.  2009 मध्ये प्रभाकरनचा मृत्यू झाला आणि या गृहलहाचा शेवट झाला. श्रीलंकेच्या सौन्याने प्रभाकरन आणि त्याच्या मुलाला ठार मारले.