लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गँसगळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांसह पाच जणांचा यात समावेश आहे. सितापूर येथे ही दुर्घटना घडली. एका कारखान्यात गुरुवारी पाईपलाईन फुटून गॅसगळती सुरु झाली. या गॅसगळतीचा आजुबाजूच्या परिसरात धोका निर्माण झाला होता. परिसरातील ५ कुत्र्यांसह काही जनावरांचाही मृत्यू झाला. यावरुन गॅस वायुच्या गळतीची तीव्रता लक्षात येते. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
#BreakingNews । उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गँसगळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांसह पाच जणांचा यात समावेश आहे. सितापूर येथे ही दुर्घटना घडली. pic.twitter.com/e3jIQABPFV
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 6, 2020
सितापूर येथे एका फॅक्टरीत कार्पेट रंगविण्यासाठी केमिकलचा वापर करण्यात येत होता. त्यावेळी बुधवारी रात्रीच गॅसगळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गॅसगळतीमुळे अनेक लोकांना त्रास होऊ लागला. तर काहींचा गुदमरुन मृत्यू झाला. गॅसगळतीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी अनेक लोकांना तेथून हलविले आणि परिसर खाली केला. दरम्यान, आरोग्य पथक या ठिकाणी दाखल झाले असून पोलिसांनी हा परिसर बंद केला आहे.
Sitapur: District administration to award Rs 4 lakhs each to the families of the 7 people, who lost their lives earlier today, allegedly due to gas leakage in a pipeline situated between a carpet factory & an acid factory. https://t.co/cGUKugGgXg
— ANI UP (@ANINewsUP) February 6, 2020
दरम्यान, गॅसगळतीचा मोठा त्रास होत असल्याने मतद कार्यात अडथळा येत होता. परिसरात दुर्गंध पसरल्याने लोकांना याचा त्रास होत होता. अनेकांना श्वास घेण्यात खूपच त्रास होत होता. गॅसगळतीत अतीक (५०, कानपूर) हा सुरत्रा रक्षकांचा मृत्यू झाला. तो आपल्या कुटुंबासह तेथेच राहत होता. यात अतीकसह पत्नी सायरा (४०), मुलगी आयशा (१२), मुलगा अफरोज (८), फैजल (१८ महिने) यांचा मृत्यू झाला.