७वा वेतन आयोग : या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा कमीतकमी पगार १८ हजारांवरून २६ हजार करण्याची मागणी होत आहे.

Updated: Sep 21, 2018, 07:04 PM IST
७वा वेतन आयोग : या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ  title=

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा कमीतकमी पगार १८ हजारांवरून २६ हजार करण्याची मागणी होत आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्रीमंडळानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारं मानधन ३ हजार रुपयांवरून ४,५०० रुपये प्रती महिना करण्यात आलं आहे. तर लघू अंगणवाडी केंद्रात कार्यरत असणाऱ्यांना २२०० रुपयांऐवजी ३,५०० रुपये प्रती महिना मिळतील.

अंगणवाडी सहायकांचं मानधन २२५० रुपये 

अंगणवाडी सहायकांचं मानधन १५०० रुपयांनी वाढून २२५० रुपये करण्यात येणार आहे. आयसीडीएस-सीएएस सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहायकांना २५० रुपये ते ५०० रुपयांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे.

नियमित प्रोत्साहन राशी २ हजार रुपये

मंत्रिमंडळ समितीनं आशाकर्मीयांसाठी राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनमधून नियमित प्रोत्साहन राशी १ हजार रुपयांनी वाढवून २ हजार रुपये केली आहे. मोदींनी ११ सप्टेंबरलाच अंगणवाडी आणि आशाकर्मी महिलांचं मानधन वाढवण्याची घोषणा केली होती.