7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा; महागाई भत्ता आणि थकबाकी मिळणार?

बैठकीत महागाई भत्त्याबाबत होणार चर्चा

Updated: Jul 7, 2021, 10:51 AM IST
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा; महागाई भत्ता आणि थकबाकी मिळणार? title=

मुंबई : 7th Pay Commission Latest Updates : देशातील जवळपास 1.2 करोड केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्सकरता आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. वाढलेला महागई भत्ता (DA) आणि थकबाकी (DR) याबाबत आझ कॅबिनेटमध्ये महत्वाचा निर्णय होणार आहे. तसेच आज जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यातील एरियरवर देखील महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. जर हा निर्णय आज घेण्यात आला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात सप्टेंबरच्या पगारात मोठी रक्कम मिळेल. 

कॅबिनेटच्या बैठकीत DA वर लागणार अंतिम मोहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये महागाई भत्त्याबाबत (DA) चर्चा होणार आहे. यापूर्वी 26 जूनला कॅबिनेट सचिव आणि अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2021 पासून महागाई भत्ता पुन्हा लागू करण्याचा निर्णय झाला होता. आता मोदी सरकार या निर्णयावर मोहर लावणार का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

31 टक्के होणार DA 

नॅशनल काऊंसिल ऑफ जेसीएम (JCM) चे सेक्रेटरी शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, 7 व्या वेतन आयोगानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता म्हणजे डियरनेस अलाऊन्स मिळणार आहे.  गेल्या तीन हप्त्यामधील वाढ पकडून आता हा DA 28 टक्क्यांवर जाईल. जानेवारी 2020 मध्ये DA 4 टक्क्यांनी वाढला होता. त्यानंतर जुलै 2020 मध्ये तीन टक्क्यांनी तर जानेवारी 2021 मध्ये DA मध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली होती. आता जुलै महिन्यात त्यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण वेतनाच्या 31 टक्के इतका महागाई भत्ता (DA) मिळू शकतो. निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनचा आकडाही याच गणितावर निश्चित होईल.