7th Pay Commission : लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, मे महिन्यात DA त वाढ मिळण्याची शक्यता कमी

नॅशनल काउंसिल-JCM-स्टाफ साइडच्या अहवालामुळे कोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना धक्का बसू शकतो.

Updated: May 20, 2021, 04:43 PM IST
7th Pay Commission : लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, मे महिन्यात DA त वाढ मिळण्याची शक्यता कमी title=

मुंबई : कोरोनाकाळात देशाची आर्थिक परिस्थिती पाहाता, गेल्या वर्षीपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (DA) थांबवला गेला आहे. मे महिन्यामध्ये ही वाढ होण्याची अपेक्षा होती, परंतु नॅशनल काउंसिल-JCM-स्टाफ साइडच्या अहवालामुळे कोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना धक्का बसू शकतो. कारण या वेळेसही त्यांना वाढीव महागाई भत्ता (DA) मिळणार नाही. याची घोषणा जूनमध्ये होण्याची शक्यता आहे.

JCM-स्टाफचे सेक्रेटरी शिवा गोपाल मिश्रा म्हणाले की, केंद्र सरकार जूनमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. यामुळे मूलभूत वेतनात किमान 4 टक्के वाढ होईल. यासाठी नॅशनल काउंसिल हे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभाग आणि  डिपार्टमेंट ऑफ पर्सनल एंड ट्रेनिंग (DoPT) या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत.

विभागाच्या म्हणण्यानुसार, कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे ही संपूर्ण योजना विस्कळीत झाली आहे. एप्रिलच्या शेवटी किंवा मे च्या मध्यापर्यंत जाहीर होणारी महागाई भत्ता वाढ आता जूनपर्यंत पुढे सरकला आहे.

महागाई भत्ता तीन हप्त्यांमध्ये मिळण्याची शक्यता

शिवगोपाल मिश्रा यांचे म्हणण्यानुसार, महागाईचा सरासरी दर लक्षात घेता मूलभूत पगार किमान 4% असू शकतो. तसेच यावेळी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता तीन हप्त्यांमध्ये देता येईल. याबाबत संयुक्त परिषद आणि केंद्र सरकारचे संबंधित अधिकारी सतत संपर्कात आहेत, लवकरच यावर चर्चा होईल.

1 जुलैपासून वाढेल पगार

कोरोना साथीच्या आजारामुळे केंद्र सरकारने जून 2021 पर्यंत कर्मचार्‍यांचे DA, DR आणि निवृत्ती वेतन थांबवले आहे. राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की, 1 जुलैपासून DA, DR वाढ पुन्हा सुरू केली जाईल, परंतु यावर अजून तरी कोणतेही पुरावे किंवा कोणाचे वक्तव्य आलेले नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना  वेट अँण्ड वॉचची भूमीका घ्यावी लागणार आहे.