7th Pay Commission : सरकार करू शकते मोठी घोषणा, इतका वाढवणार पगार

केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी अहे. मोदी सरकार लवकरच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. 

Updated: Feb 6, 2018, 07:27 PM IST
7th Pay Commission : सरकार करू शकते मोठी घोषणा, इतका वाढवणार पगार title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी अहे. मोदी सरकार लवकरच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. एप्रिल २०१८ मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली ही घोषणा करण्याची शक्यता आहे. ही घोषणा केल्यास याचा फायदा ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

किती वाढणार पगार?

सातव्या वेतन आयोगासाठी केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकार सातवा वेतन आयोग लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसापूर्वी पगारवाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं. जर आता पगारवाढीची घोषना झाली तर कर्मचाऱ्यांचा कमीत कमी २४००० रुपये होणार आहे. केंद्रीय कर्मचारी मॅट्रिक्स लेवल १-२मध्ये येतात. त्यामुळे त्यांचीच पगारवाढ होणार आहे. वाढलेला पगार एप्रिल महिन्यापासून येणार अशी शक्यता आहे. 

काय आहे आता मागणी?

केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यास त्यांचा पगार कमीत कमी ७ हजार रूपये महिन्यांवरून १८ हजार रूपये महिना होणार आहे. तेच फिटमेंट फॅक्टर सुद्धा २.५७ टक्क्यांनी वाढेल. त्यासोबत जास्तीत जास्त पगार ९० हजार रूपयांहून वाढून २.५ लाख रूपये महिना होईल. सातव्या वेतन आयोगांच्या सिफारशींना कॅबिनेटने २९ जून २०१६ मध्येच मंजूरी दिली होती. आता केंद्रीय कर्मचारी मागणी करत आहेत की, त्यांचा पगार १८ हजार रूपये महिन्यांहून वाढवून २६ हजार रूपये करावा. 

एकूण किती मिळणार वाढ?

बेसिक वेतनात १४.२७ टक्के आणि भत्यांमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण वाढ २३.६ टक्के मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर वेतन आणि निवृत्तीवेतनाचा सरकारवर अतिरिक्त १.०२ लाख कोटींचा भार पडणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x