7th pay commission: ८वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी

 अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

Updated: Feb 9, 2020, 05:24 PM IST
7th pay commission: ८वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : भारतीय पोस्टमध्ये  (India Post) अनेक पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे. भारतीय पोस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाअंतर्गत भरती होणार आहे. या रिक्त जागांसाठी उमेदवारांना पोस्टद्वारे अर्ज करावा लागेल.

या पदांसाठी अर्ज करु शकता - 

- स्किल्ड आर्टिसन्स - ८
- मोटर व्हिकल मेकेनिक - २
- वेल्डर - २
- टायरमॅन - २
- टिनस्मिथ - १
- ब्लॅक स्मिथ - १

उमेदवाराची पात्रता -

- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

- उमेदवार आठवी पास असणं गरजेचं आहे.

- मोटर व्हिकल मॅकॅनिक पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचं लायसन्स असणंही आवश्यक आहे. 

वयोमर्यादा - 

या भरतीसाठी कमीत-कमी वयोमर्यादा १८ वर्ष आहे. तर अधिकाधिक वयोमर्यादा ३० वर्ष इतकी आहे. ओबीसी प्रवर्गासाठी वयोमर्यादेत तीन वर्षांची, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. १ जुलै २०२०च्या आधारे वयोमर्यादेची गणना केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करताना कोणतीही फी भरावी लागणार नाही.

वेतन -

या भरतीवेळी उमेदवारांना २ केअंतर्गत वेतन देण्यात येणार आहे. १९,९०० रुपये प्रतिमहिना असं सुरुवातीचं वेतन असेल.

येथे पाठवा अर्ज -

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराला (सीनीयर मॅनेजर, मेल मोटर सर्विसेस, १३४-ए, एस.के. अहिर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१८) या पत्त्यावर फॉर्म आणि कागदपत्र पाठवावी लागणार आहेत. www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवरुन उमेदवार अधिक माहिती घेऊ शकतात. http://appost.in/gdsonline/ या लिंकवरही अधिक माहिती घेऊ शकतात.