धक्कादायक! लॉजमधून निघालेली मुलगी 2 दिवस घरी परतली नाही, अखेर हतबल वडिलांनी...

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत वडिलांनी सांगितले  की 1 आठवड्यापूर्वी त्याच्या मुलीचा तिच्या मित्रासोबत वाद झाला होता.

Updated: Jul 14, 2021, 11:29 PM IST
धक्कादायक! लॉजमधून निघालेली मुलगी 2 दिवस घरी परतली नाही, अखेर हतबल वडिलांनी... title=

मुंबई : झारखंडमधील दुमका जिल्ह्यात मुलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी 9 वीच्या वर्गात शिकत होती. शहरातील रसिकपूर भागात असणाऱ्या लॉजमध्ये ती वास्तव्यास होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन  मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मित्रावर त्याच्या साथीदाराच्या मदतीने मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे.  पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

हा सगळा प्रकार दुमका शहरातील रसिकपूर परिसरातील आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार,   त्यांची 13 वर्षाची अल्पवयीन मुलगी जवळच्या एका खासगी शाळेत शिकत आहे. ज्यामुळे ती शाळेपासून जवळ असलेल्या  रसिकपूर येथील लॉजमध्ये राहत होती. 9 जुलै रोजी त्यांच्या मुलीने त्यांना फोन करून सांगितलं की आज ती थोडी उशिरा घरी  परतणार आहे. पण दुपारपर्यंत ती घरी पोहोचली नाही.

त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीला फोन केला,पण तिचा फोन बंद येत होता. दुसरीकडे वडिलांनी लॉजमध्ये जाऊन चौकशी केली  असता तेथील इतर मुलींनी सांगितले की, आज सकाळी 11 वाजेपासून आपल्या मित्रांसह एका युवकाच्या बाईकवरून येथून  निघून गेली आहे.

1 आठवड्यापूर्वी मुलीचा मित्रासोबत झाला होता वाद

 मुलीच्या वडिलांचा असा आरोप आहे की, तिच्या मित्रानेच अपहरण केलं आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत वडिलांनी सांगितले  की 1 आठवड्यापूर्वी त्याच्या मुलीचा तिच्या मित्रासोबत वाद झाला होता. मुलीचा मित्राचा फोन वडिलांना आला होता, त्याने मला  फोन करुन तुमची मुलगी माझ्याबद्दल खोटी अफवा पसरवत असून माझी बदनामी करत असल्याचं सांगितलं होत. 

पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

वडिलांच्या तक्रारीच्या आधारे अल्पवयीन मुलीच्या मित्रावर आणि तिच्या अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीचा शोध पोलिस घेत आहेत.