Saree Draper Dolly Jain: 'ती' करते सेलिब्रिटींना साडी नेसवण्याचं काम! 10 मिनिटांसाठी घेते इतक्या लाखांचं मानधन

Celebrity Saree Draper Charges Rs 1 Lakh per Saree: एका मुलाखतीमध्ये करियरसंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांनी या महिलेसंदर्भातील माहिती दिल्यानंतर मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 9, 2023, 02:25 PM IST
Saree Draper Dolly Jain: 'ती' करते सेलिब्रिटींना साडी नेसवण्याचं काम! 10 मिनिटांसाठी घेते इतक्या लाखांचं मानधन title=
Saree Draper Dolly Jain (Photos Social Media)

Celebrity Saree Draper Dolly Jain: आर्टीफिशीएल इंटेलिजन्सचा सध्या बोलबाला आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच एआयमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र असं असलं तरी आजही अनेक अशा गोष्टी आहेत ज्या एआयला करता येणार नाही. एआयच्या चर्चेमुळे हल्ली अनेकजण वेगवेगळ्या गोष्टींचा एआय हे करु शकेल का वगैरे म्हणत या नव्या तंत्रज्ञानाशी उगाच संबंध जोडतानाही दिसतात. सध्या अशीच एक चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. ही चर्चा आहे एका प्रोफेश्नल महिला साडी ड्रेपरच्या मुलाखतीसंदर्भात. साडी ड्रेपर म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास साडी नेसवणारी. मात्र ही माहिला एक साडी नेसवण्यासाठी तब्बल 1 लाख 10 हजार रुपये आकारते असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना? असाच काहीसा प्रकार नेटकऱ्यांबरोबर घडला आहे.

नेमकं प्रकरण काय?

झालं असं की, ऋषभ अग्रवाल या तरुणाच्या 'द स्पेसिफिक आस्क' नावाच्या पॉडकास्टवर नुकतीच त्याने एका करियर कन्सलटंटची मुलाखत घेतली. कांचन नंदा रालहान यांची मुलाखत ऋषभने घेतली. या मुलाखतीमध्ये हटके करियर पर्यायांबद्दल दोघेही चर्चा करत असताना कांचन यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नातील एक किस्सा सांगितला. या लग्नात कांचन यांना एक अशी माहिती भेटली जिचा महिलांना साडी नेसवण्याचा वेग आणि शैली पाहून त्या थक्क झाल्या. त्यांनी या महिलेचं कौतुक केलं. मात्र त्यानंतर या महिलेने कांचन यांना आपण प्रोफेश्नल साडी ड्रेपर असल्याचं सांगितलं. आपण साडी नेसवून देण्यासाठी पैसे घेतो असंही या महिलेनं कांचन यांना सांगितलं. 

36 लाख फी

कांचन यांना त्यांच्या मुलाची मैत्रीण साडी ड्रेपर असल्याचं समजल्यानंतर फारच आश्चर्य वाटलं. या नोकरीसंदर्भात त्यांनी अधिक माहिती घेण्यासाठी या मुलीशी गप्पा मारल्या. या चर्चेदरम्यान साडी नेसवण्याच्या एका सेशनसाठी तब्बल 36 लाखांपर्यंतची फी आकारली जात असल्याचं कांचन यांना समजल्यानंतर त्या थक्क झाल्या. कांचन यांना या मुलीने आपण सामान्यपणे 10 मिनिटांच्या एका साडी ड्रेपिंग सेशनसाठी 1.10 लाख रुपये घेतो असं सांगितलं. तिने कांचन यांना तिचं सोशल मीडिया पेज चेक करण्यास सांगतानाच आपलं बिझी शेड्यूल कसं आहे याची माहितीही दिली.

कोण आहे ही मुलगी?

कांचन यांनी या साडी ड्रेपरशी चर्चा केली तिचं नाव डॉली जैन असं आहे. डॉली ही तब्बल 325 वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसवू शकते. लहानपणी बाहुल्यांना साडी नेसवण्याच्या छंदामधूनच डॉलीने प्रेरणा घेत तरुण वयात साड्यांबरोबर प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि साडी ड्रेपर होण्याचा निर्णय घेतला.

पडले दोन गट...

डॉलीबद्दलचा हा व्हिडीओ आणि कांचन यांनी दिलेली माहिती ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. काहींनी या आगळ्या वेगळ्या करियरची निवड केल्याबद्दल डॉलीचं कौतुक केलं आहे तर काहींनी साडी नेसवण्यात कसली आलीय कला असं म्हणत एवढी फी का आकारली जाते असा प्रश्न विचारला आहे. अनेकांनी डॉलीचं कौतुक केलं असतानाही काहींनी तिला हिणवलंही आहे. पाहूयात काही कमेंट्स...

दरम्यान, डॉलीची क्लायंट लिस्टही त्यांच्या करियर इतकीच भन्नाट आहे. यामध्ये हॉलीवूड अभिनेत्री गिगि हादीद, इशा अंबानी, श्लोक मेहता, दिया मेहता, राधिका मर्चंट, कियारा अडवाणी या डॉलीच्या क्लायंट आहेत.