Trending News In Marathi: पत्नीच्या हत्येप्रकरणात पतीला शिक्षा झाली गेली चार वर्ष तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. मात्र चार वर्षानंतर मृत महिला जिवंत असल्याचे समोर आले. बिहारच्या भोजपुर जिल्ह्यातील ही घटना आहे. चित्रपटालाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे. महिलेचा पती तिला सातत्याने मारहाण करत होता. पतीच्या मारहाणीला वैतागून ती माहेरी निघून आली. मात्र तिथे गेल्यानंतर दोनच महिन्यात तिच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर वडिलांचीच महिलेवर वाईट नजर होती. या सगळ्याला वैतागून महिला आत्महत्या करण्यासाठी गेली पण...
बिहार जिल्ह्यातील आरा जिल्ह्यात राहणारी धर्मशिला देवीचे दीपक कुमारसोबत झालं होतं. काही दिवसांपर्यंत त्यांच्यात सर्वकाही चांगलं होतं. मात्र नंतर दीपक धर्मशिलाला मारहाण करण्यास लागला. पतीच्या छळाला वैतागून ती तिच्या माहेरी गेली. मात्र, तिथेही तिच्या आईचे दोन महिन्यातच निधन झाले. आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांची तिच्यावर वाईट नजर होती.
धर्मशिलाने या सगळ्याला वैतागून घरातून बाहेर पडली आणि रेल्वे रूळानजीक आत्महत्या कऱण्यासाठी गेली. त्याचवेळी एका तरुणाने तिचे प्राण वाचवले. तिला सावरलं त्यानंतर धर्मशिलाने त्याला तिच्यासोबत घडलेले सगळं सांगितलं. नंतर तरुण तिला सोबत घेऊन गेला. नंतर दोघांनी एका मंदिरात लग्न केले आणि दोघेही आरामध्ये राहू लागले. धर्मशिलाने म्हटलं की तिला एक मुलगा व मुलगीदेखील आहे.
धर्मशिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचा शोध घेतला मात्र ती काही सापडली नाही. तेव्हा त्यांनी तिच्या पतीविरोधात हत्येचा आरोप केला. त्याचवेळी 31 ऑक्टोबर 2020 साली नदीच्या किनारी एका महिलेचा मृतदेह आढळला. तेव्हा तिच्या वडिलांनी ही माझीच मुलगी असल्याचे म्हटल होतं. तेव्हा हत्येच्या आरोपात तिच्या पतीला अटक करण्यात आली.
4 वर्षानंतंर पोलिसांनी धर्मशाला देवी जिवंत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने म्हटलं की, माझ्या वडिलांनी माझ्या पहिल्या पतीच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे. तसंच, दुसऱ्या महिलेचा मृतदेह दाखवत त्यांना अडकवलं आहे. आईच्या मृत्यूनंतर वडिल माझ्यासोबत अनैकित संबंध प्रस्थापित करण्याचा प्रय़त्न करत होते. ते सतत माझ्या जवळपास घुटमळत होते. तसंच पहिला पतीदेखील मला मारहाण करत होता. याला वैतागून मी घर सोडून गेले. त्यानंतर मी अजय कहार नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. आम्हाला आता दोन मुलंदेखील आहेत, अशं धर्मशिलाने म्हटलं आहे.