मुंबई : Aadhaar card : आधार कार्ड हे आपल्या जीवनातील महत्वाचा घटक झाला आहे. आधारशिवाय अनेक कामे होत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड महत्वाचे ठरले आहे. बँक खाते उघडण्यासाठी, मुलांचे स्कूल प्रवेश आणि घर खरेदीसाठी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आधार लागते. कोणत्याही सरकारी योजनांचा फायदा आधारशिवाय घेता येऊ शकत नाही.
आपण आई-वडील होणार असला तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी. आपण आपल्या बालकाचा आधार कार्ड बनवू शकता. यूआयडीएआयने (UIDAI) तशी परवानगी दिली आहे. आपल्या मुलाचा 1 दिवसाच्या बालकाचे आधार कार्ड बनवू शकता. सध्या UIDAI 5 वर्षापेक्षा जास्त वयाचे मुलांचे आधार कार्ड जारी करीत आहे, याला बाल आधार कार्ड म्हणतात.
यूआयडीएआयने ट्विटर याबाबत माहिती जारी केली आहे. आपण 1 दिवसाच्या नवजाताचे आधार कार्ड बनवू शकता. फक्त लहान मुलांचा जन्माचा दाखला
(Birth Certificate) घेणे महत्वाचे आहे. हा जन्म दाखला रुग्णालयातून मिळतो. तसेच आई किंवा वडील यांच्यापैकी एकाचे आधार कार्ड असेल तरी तुमच्या बालकाचे आधार कार्ड काढता येते.
सर्वात आधी आपण यूआयडीएआय वेबसाइट https://uidai.gov.in/my-aadhaar/get-aadhaar.html वर जा
त्यानंतर आधार कार्ड रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर अर्जामध्ये मुलांचे नाव, आपला मोबाइल नंबर आणि ई-मेल भरा.
त्यानंतर आधार कार्ड सेन्टरमध्ये appointment करण्यासाठी नियुक्त केले.
त्यानंतर आपल्या वेळेचे आधार कार्ड सेंटर जाकर आपले कागदपत्रे जमा करा.
सर्व दस्तऐवजांच्या व्हेरिफिकेशनंतर मुलाचे आधार कार्ड दिले जाईल.