मुंबई : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया किंवा UIDAI ने अलीकडेच म्हटले आहे की, आधार धारकांना त्यांचा आधार क्रमांक वापरताना आणि शेअर करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. UIDAI च्या म्हणण्यानुसार, आधार सिस्टीम एक मजबूत रणनीती आणि मजबूत तंत्रज्ञानाच्या आधारावर तयार केली गेली आहे आणि ती एक महत्त्वपूर्ण डिजिटल आयडेंटिटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विकसित झाली आहे. परंतु लोकांची सिक्योरिटी लक्षात घेता, काही सोप्या परंतु महत्त्वाच्या सुरक्षा टिप आधार क्रमांकबाबत पालन करण्याची गरज आहे.
UIDAI ची इच्छा आहे की, आधार कार्ड धारकांनी त्यांचा UIDAI आधार क्रमांक वापरताना आणि शेअर करताना फॉलो करावे.
तुम्ही तुमचे आधार कार्ड फक्त अधिकृत UIDAI पोर्टलवरून डाउनलोड केल्याची खात्री करा - https://eaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar
ई-आधार डाउनलोड करण्यासाठी, इंटरनेट कॅफे/ सार्वजनिक पीसी/लॅपटॉप वापरणे टाळा. परंतु काही कारणास्तव तुम्हाला तसं करण्याची गरज भासली, तर हे लक्षात ठेवा की, तुम्ही तुमचं ई-आधारच्या डाउनलोड केलेल्या प्रुफ हटवाल.
UIDAI आधार कार्ड धारकांना आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्याची परवानगी देते. तुमचा आधार लॉक/अनलॉक करण्यासाठी, तुम्ही mAadhaar अॅप किंवा या लिंकवरून वापरू शकता. https://resident.uidai.gov.in/aadhaar-lockunlock या सेवेसाठी तुमचा व्हीआयडी किंवा व्हर्च्युअल आयडी आवश्यक आहे. VID हा तात्पुरता, 16-अंकी क्रमांक आहे जो आधार क्रमांकाशी मॅप केला जातो.
तुमचा आधार प्रमाणीकरण हिस्टी वेळोवेळी तपासत राहा. तुम्ही गेल्या 6 महिन्यांतील 50 आधार प्रमाणीकरणाची हिस्ट्री तपासू शकता. तसेच या संदर्भात व्यवहार केल्याची अचूक तारीख आणि वेळ नमूद केली आहे, जे तुम्हाला तुमच्या आधारसोबत कोणी चुकीचं काही केलंय का? याबद्दल प्रमाणीत करते. जर त्यामध्ये झालेले व्यवहार हे तुम्ही केलेले नसतील कर 1947 वर किंवा help@uidai.gov.in वर कळवा.
पासवर्ड तुमच्या वैयक्तिक माहितीवर अनधिकृत प्रवेशापासून संरक्षणाची पहिली ओळ प्रदान करतात. तुमच्या m-Aadhaar अॅपसाठी 4 अंकी पासवर्ड सेट करणे गरजेचे आहे.
सुरक्षेबद्दल चिंतित आधार कार्ड धारकांना एक सूचना
UIDAI म्हणते की, तुम्ही तुमचा आधार क्रमांक उघड करू इच्छित नसल्यास, तुम्ही VID किंवा मास्कडचा आधार वापरू शकता, ते वैध आहे आणि स्वीकारले गेले आहे. व्हीआयडी/मास्क केलेले आधार मिळविण्यासाठी, कोणीही येथून आधार डाउनलोड करू शकतो. (https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar)
ई-आधार ऑनलाइन/ऑफलाइन प्रमाणीकरणासाठी देखील पात्र आहे. ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी, ई-आधार किंवा आधार पत्र किंवा आधार पीव्हीसी कार्डवरील QR कोड स्कॅन करा.
तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट केला आहे याची खात्री करा. तुमचा योग्य मोबाईल नंबर किंवा ईमेल आधारशी लिंक आहे की नाही याबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास, तुम्ही UIDAI वेबसाइटवर त्याची पडताळणी करू शकता.
दुसरी महत्त्वाची सुरक्षा टीप म्हणजे तुमचा आधार OTP आणि वैयक्तिक तपशील कधीही कोणाशीही शेअर करू नका. UIDAI लोकांना सांगते की, त्यांना कधीही UIDAI कडून तुमचा आधार OTP विचारणारा कॉल, एसएमएस किंवा ईमेल येणार नाही.