तिथे BJP उसळी मारतानाच इथे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं मोठं यश

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पराभव झाल्यानंतरही आम आदमी पक्षाला मोठं यश, अवघ्या 10 वर्षात आप बनला राष्ट्रीय पक्ष  

Updated: Dec 8, 2022, 12:41 PM IST
तिथे BJP उसळी मारतानाच इथे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं मोठं यश title=

Aam Aadmi Party News: गुजरात (Gujrat Election 2022) आणि हिमाचल प्रदेश विधानसभा (Himachal Election 2022) निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्य भाजपने (BJP) ऐतिहासिक विजय मिळला आहे, तर काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ झालाय. अरविंद केजरीवाल (Arwind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीला (AAP) केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलंय. हिमाचल प्रदेशमध्ये तर आपला खातंही उघडता आलं नाही. पण यानंतरही आपला मोठं यश मिळालं आहे. आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष (National Party) होण्याचे निकष पूर्ण केले आहेत. 

आप आता राष्ट्रीय पक्ष
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने दिल्लीत सत्ता काबीज केली. पण त्यानंतर आपने काँग्रेस आणि भाजपला धक्का देत पंजाबमध्येही सत्ता स्थापन केली. गोव्यात आपने 6.77 टक्के मतं मिळवत दोन जागांवर विजयही मिळवला. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपला फारसं यश मिळवता आलं नसलं तरी गुजरातमध्ये आपने 14 टक्के मतं मिळवली आहेत. त्यामुळे दिल्लीपुरता मर्यादित असलेला आप हा प्रादेशिक पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. राष्ट्रीय पक्ष झाल्याबद्दल जनतेचे आभार मानणारे पोस्टर्स आपने दिल्लीत झळकावले आहेत.

आपची 10 वर्षातली कामगिरी
2002 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली. या दहा वर्षात आपने दोन राज्यात सत्ता स्थापन केली. नुकत्याच झालेल्या दिल्ली महानगर पालिका निवडणुकीतही आपने भाजपच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत पालिकेवर झेंडा फडकावला. याशिवाय गोवा विधानसभेत 2 तर गुजरात विधानसभेत 6 जागा जिंकल्या. त्यामुळे आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष होण्याचे निकष पूर्ण केले आहेत. 

काय आहेत राष्ट्रीय पक्षाचे निकष
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काही निकष असतात. त्या पक्षाचे किमान चार खासदार असावेत. तसंच 6 टक्के मतं मिळणं आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत किमान चार राज्यात सहा टक्के मत मिळवलेली असावीत. किंवा चार राज्यात 2 विधानसभा जागांवर निवडून येणं आवश्यक आहे. आपने दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे तर गोवा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी पार केली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्ज दिल्याची माहिती आपने दिली आहे. 

देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत
देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष आहेत. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश आहे.