परिणीती चोप्राशी तुमचं नातं काय? AAP चे खासदार राघव चढ्ढा यांनी अखेर दिलं उत्तर, म्हणाले "मला परिणीती..."

Raghav Chadha on Parineeti: आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांचं नाव चर्चेत आहे. दरम्यान राघव चढ्ढा यांनी प्रथमच यावर भाष्य केलं आहे.   

Updated: Mar 25, 2023, 01:37 PM IST
परिणीती चोप्राशी तुमचं नातं काय? AAP चे खासदार राघव चढ्ढा यांनी अखेर दिलं उत्तर, म्हणाले "मला परिणीती..."

Raghav Chadha on Parineeti: आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) या दोघांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मुंबईतील एका रेस्तराँमध्ये दोघे एकत्र दिसल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातही दोघांच्या नावाची चर्चा सुरु असून वेगवेगळे दावे केले जात आहे. लोकसभेतही अध्यक्षांनी अप्रत्यक्षपणे राघव चढ्ढा यांना याप्रकरणी छेडत सोशल मीडियावर आधीच तुम्ही खूप जागा मिळवली आहे असा टोला लगावला. दरम्यान या सर्व चर्चांवर राघव चढ्ढा यांनी अखेर भाष्य केलं आहे. 

सध्या सुरु असलेल्या चर्चांदरम्यन राघव चढ्ढा यांना तुमचं परिणीतीशी नातं काय आहे? अशी विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  राघव चढ्ढा संसदेतून बाहेर येताना त्यांना परिणीतीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की "तुम्ही मला राजकारणासंबंधी विचारा, पररिणीतीसंबंधी नको". (Please ask me questions about politics, not Parineeti)

यानंतर राघव यांना त्यांची लग्नासंबंधी काय योजना आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "जेव्हा मी करेन तेव्ही नक्की सांगेन". दरम्यान पत्रकाराने त्यांना इतकं गूढ का निर्माण करत अशी विचारणा केली असता ते म्हणाले "नाही, मी कोणताही सस्पेन्स निर्माण करत नाही आहे. मी तुम्हाला सांगतोय की, मी जेव्हा लग्न करेन तेव्ही तुम्हाला कळवेन".

राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी एकत्र दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचं दोन्ही बाजूंनी सांगितलं जात आहे. मात्र अनेकांनी याबाबत शंका उपस्थित केलं असून, त्यांच्यात नेमकं नातं काय अशी विचारणा केली आहे. 

परिणीती चोप्रा सध्या इम्तियाज अली यांच्या 'चमकिला' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पंजाबी गायक अमरसिंग चमकिला यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित  आहे. परिणीतीसह या चित्रपटात दलजीत मुख्य भूमिकेत असणार आहे. ए आर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. रॉकस्टार, हायवे आणि तमाशानंतर चौथ्यांदा इम्तियाज अली आणि ए आर रहमान एकत्र काम करत आहेत.