'ट्रिपल तलाक' पीडितेवर अॅसिड हल्ला, गंभीररित्या जखमी

पीडित महिला दिल्लीची रहिवासी आहे

Updated: Sep 13, 2018, 04:48 PM IST
'ट्रिपल तलाक' पीडितेवर अॅसिड हल्ला, गंभीररित्या जखमी title=

बुलंदशहर : उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरात एका 'ट्रिपल तलाक' पीडितेवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. पीडितेच्या दिरानंच तिच्यावर हा अॅसिड हल्ला केल्याचं समजतंय. बुलंदशहरातल्या अगौता पोलीस स्टेशन क्षेत्राच्या जोलीगढ भागातील ही घटना आहे. महिलेची स्थिती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तिला जिल्हा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

या प्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय. पीडित महिला दिल्लीची रहिवासी आहे... ती सध्या ट्रिपल तलाक आणि हलाला प्रथेविरुद्ध लढतेय.

आपल्यावर दिरासोबत हलाला करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिनं केला होता. 

पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध तीन तलाकचा वाद सुरू होता. पतीनं तीन तलाक दिल्यानंतर दिरासोबत 'हलाला'साठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिनं केला होता.