वडिलांच्या मृत्यूनंतर आईने शेळीचे दूध विकून बनवलं IAS अधिकारी, वाचा प्रेरणादायी प्रवास

विशाल कुमार याने UPSC परीक्षेत 484 वा क्रमांक मिळवला आहे. चला तर जाणून घेऊयात विशाल कुमार संघर्षमय प्रवास 

Updated: Sep 18, 2022, 07:43 PM IST
वडिलांच्या मृत्यूनंतर आईने शेळीचे दूध विकून बनवलं IAS अधिकारी, वाचा प्रेरणादायी प्रवास title=

UPSC Story: आयएएस होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते, पण जेव्हा घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते तेव्हा अवघड होऊन बसते. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका IAS अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने घरखर्च चालवण्यासाठी एक बकरी पाळली आणि शिक्षणाचा खर्च उचलला. बिकट परिस्थितीवर मात बिहारच्या विशाल कुमार याने यश संपादन केलं आहे. विशाल कुमार याने UPSC परीक्षेत 484 वा क्रमांक मिळवला आहे. चला तर जाणून घेऊयात विशाल कुमार संघर्षमय प्रवास 

विशालने 2011 साली दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत अव्वल होता. त्यानंतर बारावी पूर्ण केल्यानंतर त्याने 2013 मध्ये IIT कानपूरमध्ये प्रवेश घेतला आणि 2017 मध्ये IIT देखील केले. घरची बिकट स्थिती पाहता आईला मदत करण्यासाठी विशालने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. एका कंपनीत विशालने सुमारे एक वर्ष काम केले. नोकरीदरम्यानच विशालने अचानक यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले.

विशालची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाप्रती इच्छाशक्ती पाहून त्याच्या शिक्षकाने त्याच्या कोचिंगची फी भरली. तसेच विशालला त्याच्या घरात जागाही दिली. विशालने तिथे राहून यूपीएससीची तयारी केली आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस झाला.

2008 मध्ये विशालच्या वडिलांचे निधन झाले. ते मोलमजुरी करून घरचा उदरनिर्वाह करत असे. त्यांच्या जाण्यानंतर घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती.