पुन्हा लागणार म्हाडाच्या घरांची लॉटरी

म्हाडातर्फे  घरे तसेच गाळ्यांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच डिपॉझिट रकमेमध्ये यंदा कितीही घरांसाठी अर्ज करता येणार आहे. 

Updated: Mar 3, 2019, 02:48 PM IST
पुन्हा लागणार म्हाडाच्या घरांची लॉटरी

मुंबई : म्हाडातर्फे  घरे तसेच गाळ्यांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच डिपॉझिट रकमेमध्ये यंदा कितीही घरांसाठी अर्ज करता येणार आहे. घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठा दिलासा देणारी बाब आहे. २१७ घरे आणि २७६ गाळ्यांसाठी ही जाहिरात काढली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असणाऱ्या या दुकानांचे लिलाव यातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे म्हाडाच्या तिजोरीत दिडशे कोटींची भर पडणार आहे . मात्र इतक्या दिवसापासून ज्या अधिकाऱ्यांनी पडून असलेल्या या दुकानांकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार का हा प्रश्न आहे.

म्हाडाच्या योजनांमुळे आज कित्येक कुटुंबाचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. म्हाडा नेहमीच नागरिसांठी सवलीती काढत असतात. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात घरे घेणाऱ्यांसाठी एक योजना आखण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हाडा लॉटरी द्वारे १४,००० घरांचे वाटप करण्यात येणार आहे.   

मुंबई, कोकण, पुणे आणि औरंगाबाद क्षेत्रात म्हाडाच्या योजना आहेत. मुंबई मध्ये २३८ घरे आणि १०७ दुकाणांची घोषणा करण्यात येणार आहे. नाशिक मध्ये १००० घरे पुण्यात ४४६४ घरे, औरंगाबाद मध्ये ८०० आणि कोकण मध्ये ९००० घरांच्या लॉटरीची घोषणा करण्यात येणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x