close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राजकारणात पुन्हा एकदा 'थप्पड की गूंज'

राजकारणात पुन्हा एकदा एका नेत्याला थप्पड म्हणजेच कानशिलात खावी लागली आहे

Updated: Apr 19, 2019, 07:53 PM IST
राजकारणात पुन्हा एकदा 'थप्पड की गूंज'

मुंबई : राजकारणात पुन्हा एकदा एका नेत्याला थप्पड म्हणजेच कानशिलात खावी लागली आहे. गुजरातमधल्या सुंरेंद्रनगर भागात हार्दिक पटेलांची सभा होती. त्यावेळी एक माणूस व्यासपीठावर आला आणि त्यानं हार्दिक पटेलांच्या श्रीमुखात भडकावली. अचानक झालेल्या हल्ल्यानं गोंधळलेले पटेल बाजूला झाले. मारहाण करण्यात आलेल्या या व्यक्तीला पकडण्यात आलं आहे. भाजपा प्रवक्ते जेव्हीएल नरसिंहा यांच्यावर शक्ती भार्गवनं बूट फेक केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे. आतापर्यंत भारतीय राजकारणात अनेक नेते या बूट फेक आणि चप्पल फेकीला बळी पडले आहेत. 

शरद पवारांनाही दिल्लीतल्या एका कार्यक्रमानंतर या घटनेचा सामना करावा लागला होता. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, काँग्रेस प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांच्यावरही बूटफेकीचे प्रकार घडले होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावरही बूट भिरकावण्यात आला होता. त्यामुळे बूट फेकीचं हे लोण जगात सगळीकडे आहे. आणि राजकारणातली ही बूटफेक आणि थप्पडची गूंज अजूनही शिल्लक आहे.