AI Pics: उतारवयात आजीबाईंची कमाल, स्केटिंग करत उडवून दिली धमाल... Photo पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Viral Old Ladies Skating AI Photos: सध्याचा जमाना आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इन्टॅलिजन्सचा त्यामुळे सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे एआय (AI Photos) निर्मित फोटोंची. सध्या असेच काही इंटरेस्टिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आजीबाई (Old Ladies Skating) या फोटोत तुम्हाला चक्क स्केटिंग करताना दिसतील. 

Updated: Apr 21, 2023, 08:12 PM IST
AI Pics: उतारवयात आजीबाईंची कमाल, स्केटिंग करत उडवून दिली धमाल... Photo पाहून तुम्हीही हेच म्हणाल title=
@tarqeeb/ instagram

Viral Old Ladies Skating AI Photos: लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... आपल्या आजूबाजूला कुठेही लहान मुलं ही खेळत असतील तर आपल्याला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटते. बालपणी आपण इतके खेळ खेळले असतील ज्याची आपल्यालाही अनेकदा गंमत वाटते. तुम्हीही लहानपणी स्केटिंग (Old Ladies Skatings) केलं असेल. हा खेळ आपल्या सर्वांचाही आवडीचा खेळ होता त्यामुळे कधी शाळा संपतेय आणि आपण पुन्हा एकदा स्केटिंग करायला लागतोय अशी आपल्या सर्वांचीच आठवण असेल. परंतु तुम्ही कधी म्हाताऱ्या, वयोवृद्ध बायकांना स्केटिंग करताना पाहिलंय का? हे चित्र दुर्मिळच... परंतु एक पठ्ठ्यानं मात्र हे क्षण निर्माण केले आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं? चला तर मग जाणून घेऊया यामागील गुपितं या लेखातून. 

सध्या आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या (Artifical Intelligence) फोटोंची चर्चा आहे. याचे अॅप्सही प्रचंड चर्चेत आहेत. आता असेचही काही फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये काही वयस्कर बायका या स्केटिंग करताना दिसत आहेत. हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना खरंच असं वाटलं की 70-80 वयातील महाताऱ्या बायका या खरोखरच स्केटिंग करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अनेकांना आनंद तर झालाच परंतु आश्चर्यही वाटले. पण या फोटोंमागील खरं काय आहे हे जाणून घेतल्यानंतर मात्र अनेकांनी (Viral Old Ladies AI Photos) नाराजीही व्यक्त केली तरीही खरं कारण समजल्यावर अनेकांनी कलाकाराचे कौतुकही केले. 

आजकाल वयस्कर मंडळींही प्रचंड फीट असतात. तरूणांनाही लाजवेल असं आजच्या वयस्कर लोकांचा फीटनेस असतो. आता व्हायरल होणाऱ्या या आजीबाईंचे स्केटिंग पाहून मात्र पाहणारेही प्रचंड थक्क झाले आहेत. @tarqeeb (ashish Jose) या इन्टाग्राम युझरनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना आत्तापर्यंत 1 लाख 60 हजाराच्या वर लाईक्स मिळाले आहेत. या फोटोंखाली अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं कमेंटस करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी या फोटोखाली सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. सगळ्यांना हे फोटोज पाहून प्रचंड आनंद झाला. अनेकांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या तर अनेकांनी कलाकाराच्या कलेचे कौतुकही केले. सध्या आर्टिफिशियल इन्टॅलिजन्स हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यातून अनेक गोष्टी साध्य करणं शक्य झालं आहे. त्यामुळे हे फोटोज सर्वत्र व्हायरल झाले आहेत. तुम्ही हे फोटोज पाहिलेत का? नसतील तर पाहा एक क्लिकवर