विमानाने प्रवास करण्याची सुवर्ण संधी

प्रवाशांसाठी खास ऑफर 

Updated: Sep 2, 2018, 11:23 AM IST
विमानाने प्रवास करण्याची सुवर्ण संधी title=

मुंबई : मलेशियाची एअर एशिया बरहाद आणि टाटा समूह द्वारा चालवली जाणारी एअर एशिया इंडियाने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. 1,399 रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि 999 रुपयांमध्ये देशांतर्गत प्रवास तुम्ही करु शकता.
 
एअर एशियाने म्हटलं की, यासाठी तिकीटांची विक्री शनिवार मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे. आठ दिवसांपर्यंत ही विक्री सुरु राहणार आहे. फेब्रुवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 या दरम्यान तुम्ही प्रवास करु शकता. बिग सेल प्रमोशन' अंतर्गत कंपनीने देशांतर्गत प्रवासासाठी 999 रुपयांचं तिकीट उपलब्ध केलं आहे.

आंतरराष्ट्रीय ठिकाणी प्रवास करण्यासाठी 1399 रुपयांचं तिकीट उपलब्ध करण्यात आलं आहे. ही ऑफर एअर एशिया समूहाच्या सर्व नेटवर्क- एअर एशिया इंडिया, एअर एशिया बरहाद, थाय एअर एशिया आणि एअर एशिया एक्ससाठी उपलब्ध असणार आहे.