फ्लाईट सुरु करण्याबाबत एअर इंडीयाचा महत्वाचा निर्णय

एअर इंडीयाने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतलाय

Updated: Apr 30, 2020, 05:21 PM IST
फ्लाईट सुरु करण्याबाबत एअर इंडीयाचा महत्वाचा निर्णय title=

नवी दिल्ली : कोरोना वायरसच्या संकटामुळे संपूर्ण देश ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. यामुळे रस्ते, रेल्वेपासून हवाई मार्ग बंद ठेवण्यात आलाय. आता ३ मेनंतर सरकार लॉकडाऊन उठवणार का ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला विचारला जात आहे. हवाई मार्ग कधी सुरु होणार ? याची देखील विचारणा होत आहे. एअर इंडीयाने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

मे महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे १५ मेपासून आपली सेवा सुरु करणार असल्याचे एअर इंडीयाने म्हटले आहे. देशाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सेवा सुरु करण्याचा विचार सुरु आहे. एअर इंडीयाने यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत.

एअर इंडीयाने आपले पायलट्स आणि क्रू मेंबर्सना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. हवाई सेवेशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल द्वारे ही माहिती पोहोचवण्यात आली आहे. या ईमेलमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी सिक्योरीटी पासची माहीती देण्यात आली आहे. 

१५ मे नंतर आम्ही साधारण ३० टक्के उड्डाण सुरु करण्याचा विचार करत असल्याचे यामध्ये लिहिले आहे. तुम्ही सर्वासाठी तयार राहा. कोरोना वायरसचे वाढते संकट पाहता २५ मार्चपासून लॉकडाऊनचा कालावधी वाढवत ३ मे पर्यंत नेण्यात आला आहे.