मुंबई : भारतीय एअरलाईन्समध्ये आता लवकरच इंटरनेटची सुविधा मिळणार आहे.
व्हॉट्सअॅप, मेसेजिंग, इमेल, कॉलिंग अशा सार्याच सुविधा विमानप्रवासादरम्यान मिळण्याचि शक्यता आहे.
विमानकंपन्याचे स्टेकहोल्डर्समध्ये एकमत झाले आहे. सिविल एविएशन डिपार्टमेंटदेखील या निर्णयाच्या पाठिशी आहे.पण कोणी, किती आणि कुठे इंटरनेटचा वापर करावा या बाबतचा निर्णय मात्र क्रु मेंबर्स घेणार आहेत.
दिल्लीतील ‘इन-फ्लाइट कनेक्टिविटी’इवेंट मध्ये या निर्णयाबाबात चर्चा झाली. देशी आणि विदेशी अशा दोन्ही प्रवासांसाठी नियम सारखेच असतील तर सुविधा देणं अधिक सुकर होईल अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या कोणत्याही भारतीय एअरलाईन्स कंपनीमध्ये इंटरनेटची सुविधा नाही.
ट्रायच्या माहितीन्यसार जगभरात केवळ ७० एअरलाईन्समध्ये विमानप्रवासामध्ये वायफायची सुविधा दिली जाते. तर ३० एअरलाईन्समध्ये प्रवासी मोबाईल फोन वापरू शकतात. ब्रिटिश एयरवेज, एयर एशिया, एयर न्यूजीलॅंड आणि वर्जिन अटलांटिकमध्ये ही सोय आहे.
देशी विदेशी विमानप्रवासांमध्ये इन फ्लाईट कनेव्हिटीचा विचार सुरू असताना कोणत्या कंपन्या ही सुविधा देतील याबाबतही विचार आणि स्पर्धा सुरू आहे.
एअरटेल आणि व्होडाफोनने एयर-टू-ग्राउंड (ए2 जी) संचार सेवा देण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. एयर-टू-ग्राउंड (ए2 जी) सेवा इतर अवजड आणि सॅटलाईट कनेक्टीव्हिटीपेक्षा अधिक चांगली आहे.
रिलायन्स जिओने मात्र इन-फ्लाइट कनेक्टिविटीसाठी एलटीई आणि सॅटेलाइट बैकहॉलचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.