FD करणाऱ्यांसाठी खूशखबर; 'ही' बँक देतेय सर्वाधिक व्याज आणि अनेक फायदे

Airtel Payments Bank FD: तुम्ही बचतीसाठी बऱ्याच वेळा मुदत ठेवी (FD) करीत असालच. सुरक्षित गुंतवणूक म्हणून मुदत ठेवींवर लोकांचा विश्वास आहे.

Updated: Apr 27, 2022, 02:23 PM IST
FD करणाऱ्यांसाठी खूशखबर; 'ही' बँक देतेय सर्वाधिक व्याज आणि अनेक फायदे title=

मुंबई : Airtel Payments Bank FD: तुम्ही बचतीसाठी बऱ्याच वेळा मुदत ठेवी (FD) करीत असालच. सुरक्षित गुंतवणूक म्हणून मुदत ठेवींवर लोकांचा विश्वास आहे.  मात्र बचतीसाठी आता लोकं इतरही पर्याय वापरत आहेत. पण आजही अनेकजण 'एफडी'ची क्रेझ कमी झालेली नाही. तुम्हीही FD करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

इंडसइंड बँकेसोबत करार

एअरटेल पेमेंट्स बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एफडीची सुविधा सुरू केली आहे. यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेने इंडसइंड बँकेशी करार केला आहे. याअंतर्गत बँक एफडीवर 6.5 टक्के ते 7 टक्के व्याज देईल. सध्या इतर सरकारी आणि खाजगी बँका FD वर जास्तीत जास्त 6 टक्क्यांपर्यंत व्याज देतात.

मॅच्युरिटीपूर्वी एफडी तोडल्यास दंड नाही

तुम्ही कोणत्याही कारणामुळे मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडली तरी बँक कोणताही दंड आकारणार नाही. बँकेने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, FD सुविधा सुरू केल्याने एअरटेल पेमेंट्स बँकेने डिजिटल बँकिंग पोर्टफोलिओ मजबूत केला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के व्याज

एअरटेल थँक्स अॅपद्वारे ग्राहक 500 ते 1,90,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात. त्यावर त्यांना वार्षिक 6.5 टक्के व्याज दिले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवर 0.5 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.