अलकायदाच्या एका दहशवताद्याला दिल्लीतून अटक

दहशवादी संघटना अल कायदाच्या एका दहशतवाद्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. रजा उल अहमद असं या दहवतवाद्याचं नाव असल्याची माहिती मिळते आहे. दिल्ली पोलिसांना स्पेशल सेलच्या मदतीने कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली.

Updated: Aug 10, 2017, 09:33 AM IST
अलकायदाच्या एका दहशवताद्याला दिल्लीतून अटक title=

नवी दिल्ली : दहशवादी संघटना अल कायदाच्या एका दहशतवाद्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. रजा उल अहमद असं या दहवतवाद्याचं नाव असल्याची माहिती मिळते आहे. दिल्ली पोलिसांना स्पेशल सेलच्या मदतीने कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली.
 
बांग्लादेशमधील अलकायदाची एक ब्रांच असलेली एबीटी (अंसारुल्ला बांग्ला टीम)चा हा सदस्य आहे. १५ ऑगस्टच्या आधी याला केलेली अटक महत्त्वाची मानली जात आहे. कारण भारतातील मोठ्या शहरांवर हल्ला करण्यासाठी याला भारतात पाठवलं होतं.

पोलिसांनी याची चौकशी केली ज्यामध्ये असं पुढे आलं की, यूपीमधील मुजफ्फरनगरमधून अटक करण्यात आलेल्या अब्दुल्लाह प्रकरणात देखील याचा हात होता. चार दिवसापूर्वी याला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी याला पश्चिम बंगाला पोलिसांकडे सोपवलं आहे.