पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या प्रचारात 'एक है तो सेफ है' असा नारा दिला. यानंतर याच घोषणेवरून राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केलाय. धारावी आणि अदानींच्या मुद्यावरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय. पाहुयात.
महाराष्ट्राच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी एक है ते सेफ हैचा नारा दिला. आता राहुल गांधींनी याच मुद्यावरून मोदींसह भाजपला कोंडीत पकडलंय. धारावी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय...धारावी अदानींना विकली जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. पत्रकार परिषदेतच राहुल गांधींनी पोस्टर्स दाखवून मोदींवर गंभीर आरोप केलाय. पंतप्रधान मोदी आणि अदानींचा सोबतचा फोटो दाखवत राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केलाय. पंतप्रधान मोदींनी एक है तो सेफ है चा नारा अदानींसाठी दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
तर काँग्रेसनंच कसं अदानींना मोठं केलं हे सांगत थेट भाजपने थेट रॉबर्ट वाड्रा आणि अदानींचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले आहेत. त्यासोबतच एक है तो सेफ है राहुल गांधी फेक है असा टोलाही यावेळी भाजप नेते विनोद तावडेंनी यावेळी लगावलाय.
राहुल गांधी अदानींच्या मुद्यावरून अनेकदा नरेंद्र मोदींना टार्गेट करतात. महाराष्ट्र निवडणुकीत राहुल गांधींनी पुन्हा एकदा अदानींवरून मोदींवर निशाणा साधलाय. एकाच व्यक्तीला धारावी, एअरपोर्ट, इतर उद्योगधंदे दिले जातात, असा आरोप राहुल गांधींनी केलाय. महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेल्या उद्योगधंद्यांच्या यादीचं वाचनही राहुल गांधींनी केलंय. महाराष्ट्रातून 7 लाख कोटींचे प्रकल्प इतर राज्यात गेले. पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही, असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी अदानींना टार्गेट केलं. आता राहुल गांधींनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आक्रमकपणे अदानींवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय.