Ambulance Video : डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत गर्दीतून अशी रुग्णवाहिका निघून गेली !

अनेकदा आपण ऐकले असाल की गर्दीत रुग्णवाहिका अडकली आहे. किंवा रुग्णवाहिकेच्या (Ambulance Video) गर्दीतून मार्ग काढणे अवघड होते. किंवा मार्ग सापडत नाही. मात्र, सोशल मीडियावर असा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे की...

Updated: Mar 31, 2021, 02:43 PM IST
Ambulance Video : डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत गर्दीतून अशी रुग्णवाहिका निघून गेली ! title=

मुंबई : अनेकदा आपण ऐकले असाल की गर्दीत रुग्णवाहिका अडकली आहे. किंवा रुग्णवाहिकेच्या (Ambulance Video) गर्दीतून मार्ग काढणे अवघड होते. किंवा मार्ग सापडत नाही. मात्र, सोशल मीडियावर असा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे की, तो पाहिल्यानंतर तुमचे डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. रुग्णवाहिकेचा वेग इतका आहे की तुम्ही पाहता पाहता गाडी डोळयासमोरुन निघूनही गेली. दरम्यान, अनेक चांगल्या गाड्या किंवा ग्लॅमरस गाड्याही कधी कधी वेगापुढे अपयशी ठरतात. हा व्हिडिओ  (Ambulance Video) केरळचा असून रुग्णवाहिका घेऊन चालक रुग्णालयाच्या दिशेने जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चकित होत आहे.

गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा वेग

गर्दीच्या ठिकाणी एखादी रुग्णवाहिका तुम्ही इतक्या वेगाने पाहिलीही नसेल. तसेच गर्दीच्या ठिकाणी इतक्या वेगाने जाऊ शकत नाही. मात्र, केरळचा हा व्हिडिओ  (Ambulance Video) पाहिला तर डोळ्यावरचा विश्वासच बसणार नाही. हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिका अत्यंत वेगाने आली आणि चौकातून सहज गर्दीतून वाट काढत पुढे निघून गेली. वेगवान रुग्णवाहिका कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. लोक सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

लोकांच्या जोरदार प्रतिक्रिया

या व्हिडिओवर  (Ambulance Video) युजर्स वेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. काही लोक असे म्हणत आहेत की, जर रुग्णवाहिका या वेगाने जात असेल तर आतील रुग्ण खाली पडला असावा. तर असे काही लोक आहेत, जे या वेगाने गाडी चालविणाऱ्याचालकाचे कौतुक देखील करत आहेत. या क्षणी, हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असला तरीही, प्रत्येक रुग्णवाहिका चालकाला लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कारण रुग्णाचा जीव वाचावा यासाठी चालकांनी जोखीम पत्करली आहे. यामुळे रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल व्हावा आणि त्याचे आयुष्य योग्य वेळी वाचू शकेल.