BFसोबतचे तसले फोटो पाहिले, प्रेमात आईचा अडथळा, अल्पवयीन मुलीने रचला भयंकर कट

Anjali Bajaj Murder Case: नात्याला काळिमा फासणारी एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. अल्पवयीन मुलीनेच आईच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 15, 2023, 11:28 AM IST
BFसोबतचे तसले फोटो पाहिले, प्रेमात आईचा अडथळा, अल्पवयीन मुलीने रचला भयंकर कट title=
Anjali Murder Case Agra Update 16 years ols girl and her Boyfriend killed her mother

Anjali Murder Case: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथेली प्रसिद्ध व्यापारी उदित बजाज यांच्या पत्नीच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. उदित यांची पत्नी अंजली बजाज यांची ७ जून रोजी हत्या करण्यात हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात कोणतेही पुरावे नसल्याने आरोपींना शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, आरोपींच्या एका चुकीमुळं पोलिसांचा संशय बळावला आणि ते पोलिसांच्या चावडीत सापडले. पोलिसांनीव बजाज कुटुंबीयांनी आरोपीला पाहताच त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. पोटच्या लेकीनेच आईच्या हत्येचा कट रचला. 

उदित बजाज हे उद्योजक आहेत. त्यांची १५ वर्षांची मुलगी ७ जून रोजी दुपारी बाजारात जायचं कारण सांगून घरातून निघाली. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली न्वहती. म्हणून अंजली बजाज यांनी तिला फोन केला. तेव्हा मुलीने त्यांना मी एका मंदिरात आलीये तु मला घ्यायला तिथेच ये, असा व्हॉट्सअॅप मेसेज केला. मुलीने सांगितलेल्या पत्त्यावर उदित बजाज यांच्यासोबत निघाल्या. दोघंही मंदिरात पोहोचल्यावर त्यांना पुन्हा मुलीचा मेसेज आला. त्या मेसेजमध्ये तिने त्यांना पुन्हा दुसऱ्या ठिकाणी भेटायला बोलवलं. 

मुलीचा मेसेज मिळाल्यावर त्यांनी पत्नी अंजली बजाज यांना मंदिरातच थांबायला सांगून मुलीला आणण्यासाठी गेले. मात्र, तिथे पोहोचताच त्यांना पुन्हा मुलीचा मेसेज आला की ती घरी पोहोचली आहे मला आणायला यायची गरज नाही. त्यानंतर उदित पुन्हा अंजली यांना आणण्यासाठी मंदिरात गेले. मात्र तिथे त्या नव्हत्याच. शोधाशोध केल्यानंतरही त्या सापडल्या नाहीत. तेव्हा उदित यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी अंजली यांचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर मंदिर परिसरात असलेल्या एका नाल्याजवळ त्यांना त्यांचा मृतदेह सापडला. अंजली यांच्या मृतदेहावर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या. त्याचबरोबर त्यांच्या गळ्यावरही निशाण होते. अंजलीच्या या गूढ हत्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती. उदित यांच्या व्यापारीजगतातील कोणी शत्रू असतील त्यांनी अंजलीची हत्या घडवून आणली असावी, असां संशय पोलिसांना होता. मात्र, प्रत्यक्षात तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना ही धक्का बसला. 

उदित यांनी पोलिसांनी त्या दिवशी घडलेला सगळा घटनाक्रम सांगताच पोलिसांचा त्याच्या अल्पवयीन मुलीवरचा संशय आला. पोलिसांनी तिचा फोन तपासताच एका मुलासोबत तिचे फोटो व चॅट दिसून आले. तेव्हा पोलिसांनी त्या मुलाचीही चौकशी करण्यास सुरुवात केली आणि त्यांचा संशय खरा ठरला.

अंजली यांची मुलगी शिलाचे प्रखर गुप्ता नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. अंजली यांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. अंजली यांनी मुलीचे तसले फोटोही पाहिले होते. त्यामुळं त्यांनी शिलाला त्याला भेटण्यासही बंदी घातली होती. त्यामुळं आईचा आपल्या रस्त्यातून हटवण्यासाठी मुलीनेच प्रियकरासोबत तिच्या हत्येचा प्लान रचला. प्रखरने या प्लानमध्ये आणखी एकाला पैशाचे लालच दाखवून सामील करुन घेतले. 

प्लाननुसार शिलाने तिच्या आई-वडिलांना वेगवेगळ्या जागी बोलवलं आणि आईला एकटं गाठून प्रखर आणि शिलूने अंजली यांची हत्या केली.