नवी दिल्ली : कोरोनामुळे देशासमोर मोठे संकट उभे राहीले आहे. लॉकडाऊन सुरु असल्याने जनतेच्या संचारावर निर्बंध आले आहेत. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालाय तितकाच लोकांच्या आस्थेवर देखील झालाय. कोरोना संकटामुळे कोणतेही धार्मिक सण सार्वजनिकरित्या साजरे करता येणार नाहीत. लॉकडाऊन सुरु असल्याने पहील्यांदाच ईदमध्ये गळाभेट होणार नाही. तसेच सामुदायिक नमाज पठण देखील होणार नाही. अंजुमन इस्लामिया, मोहरम कमेटीने यासंदर्भातील महत्वाचा निर्णय घेतलाय.
मल्लीताल डीएसएस मैदानात एसडीएम विनोद कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी घरी राहूनच नमाज पठण केले जाईल.
एकमेकांना ईदच्या शुभेच्या देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
ज्याप्रमाणे रमजानच्या शुभेच्छा घरी राहून दिल्या त्याप्रमाणे ईदमध्ये नमाज वाचन देखील घरी राहूनच होईल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवा. लॉकडाऊनचे पालन करा असे आवाहन अंजुमन कमेटीचे मोहम्मद फारुख यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. प्रत्येकाने जागरुक रहावे असे आवाहन मुस्लिम समुदायाला करण्यात आले.
तसेच मुस्लिम समाजाने देखील पोलीस आणि प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले.