April Fool बनवण्याच्या सुपरहीट आयडीया; तुम्हीही मित्रांसोबत ट्राय करून पहा

April Fool Day 2022: केवळ भारतातच नाही तर जगभरात दरवर्षी 1 एप्रिल रोजी 'एप्रिल फूल डे' साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये हा दिवस सुट्टीचाही असतो. एप्रिल फूलच्या दिवशी लोक एकमेकांची चेष्टा करतात. 

Updated: Apr 1, 2022, 09:33 AM IST
April Fool बनवण्याच्या सुपरहीट आयडीया; तुम्हीही मित्रांसोबत ट्राय करून पहा title=

मुंबई : प्रँकिंग व्यतिरिक्त इतर अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये लोक एकमेकांशी चेष्टा मस्करी करतात. काही ठिकाणी तो 'ऑल फूल्स डे' म्हणूनही ओळखला जातो. तुमच्या ऑफिसमध्ये, घरातील किंवा शाळेतील सहकारी, कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत मस्करी करण्याच्या आयडीया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ओरियो बिस्किट मस्करी -

ओरियो बिस्किट से कर सकते हैं मजाक-

जर तुमचा मित्र ओरियो प्रेमी असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम प्रँक आहे. बिस्किटांमधील क्रीम काढून टाका आणि नंतर पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट लावा. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला देता तेव्हा त्यांना सहज एप्रिल फूल बनवता येईल.

ऑफिसमध्ये सायरन वाजवा

ऑफिस में भोंपू के जरिए करें प्रैंक

जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा तुमच्या सहकाऱ्याच्या खुर्चीखाली दाबणारा हॉर्न ठेवा. खुर्चीवर बसताच मोठा आवाज होईल आणि तो घाबरून जाईल.

बाथरूममध्ये साबणावर नेल पेंट लावा

बाथरूम में साबुन पर लगा दें नेल पेंट-

तुमच्या बाथरूममधील साबण बारला पारदर्शक नेल पेंटने रंगवा. आंघोळीच्या वेळी साबण वापराचा त्यांना वेगळाच अनुभव येईल.

वॉशरूमच्या बाथरुममध्ये अशी प्रँक 

वॉशरूम के बाथरूम में यूं करें प्रैंक-

जेव्हा कोणी वॉशरूममध्ये जातो तेव्हा तो रिकामा बाथरूम शोधतो. तुम्ही जीन्स आणि शूजची एक जोडी घ्या आणि त्यांना वेस्टर्न बाथरूममध्ये ठेवा. लोकं खूप वेळ कथित व्यक्ती बाहेर येण्याची वाट पाहत राहतील.

लॅम्पमध्ये झुरळांचा प्रॅंक
लैंप में कॉकरोच का प्रैंक
 

काळ्या रंगाचा कागदाचा मोठा झुरळ किंवा इतर कोणताही कीटक बनवा आणि लॅम्पच्या आत लावा. त्यामुळे झुरळ किंवा किटक लॅम्पच्या आत लावलेले दिसून येईल.