नवी दिल्ली : एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारत जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. त्यासाठी आपले लष्करी सामर्थ्य अद्यावत करून शस्त्रास्त्रांची खरेदी केरण्यासही भारताने प्रोत्साहन दिले आहे.
विशेष म्हणजे अनेक वर्षे जून्या असलेल्या शस्त्रांना बदलून त्याजागी अद्ययावत शस्त्रे खरेदी करण्यासाठी भारताने ४०,००० कोटी रूपयांच्या बजेटला मान्यता दिली आहे. इतक्या प्रचंड निधीतून भारत बंदुका, लॉंचर्स, कार्बाईन्स, तसेच विविध प्रकारचे रणगाडेही खरेदी करणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी सरकारवर दबाव होता. खास करून चीन आणि पाकिस्तानकडून सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दबाव वाढला होता. त्यामुळे विदेशी शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने डीआरडीओला आपल्या पातळीवर शस्त्रास्त्रे खरेदी करावीत, असे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात याबाबत सवीस्तर माहिती दिली जाणार आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच संरक्षण मंत्रालयाने ७.६२ कॅलिबर गन्ससाठी फील्ड ट्रायल घेतल्यावर त्याबाबतचा प्रस्ताव रद्द केला होता. आता सुरूवातीला १०,००० हजार लाईट मशीन गन्स खरेदी करण्याचा विचार आहे. याशिवाय लष्कराला ७.६२ एमएम राईफलच्या स्पेशिफिकेशन्सलाही मंजूरी दिली जाणार आहे.