'मला मंत्रीपद देऊ नका', अरुण जेटलींचं मोदींना पत्र

केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

Updated: May 29, 2019, 03:11 PM IST
'मला मंत्रीपद देऊ नका', अरुण जेटलींचं मोदींना पत्र title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. गेल्या दीड वर्षापासून जेटली यांची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे त्यांना जबाबदारी देण्यात येऊ नये असं त्यांनी या पत्रातून म्हटलं आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये अशी मागणी देखील त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर एनडीए सरकारमध्ये कोण-कोण मंत्री बनणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जवळपास ६५ ते ७० खासदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र या प्रमुख खात्यांना नवे मंत्री मिळणार आहेत. ३० मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

मागच्या वर्षी मे महिन्यात अरुण जेटली यांची किडनी प्रत्यारोपण झालं होतं. यानंतर जेटलींच्या पायाला सॉफ्ट टिशू कँसर झाला. ज्याच्या सर्जरीसाठी ते जानेवारीमध्ये अमेरिकेले गेले होते. सध्या डॉक्टरांनी त्यांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री असताना त्यांनी ही जबाबदारी खूपच सक्षमपणे पार पाडली आहे.