मुख्य सचिव मारहाण प्रकरणी पोलीस केजरीवालांच्या घरी

मारहाणप्रकरणी चौकशी कऱण्यासाठी दिल्ली पोलीस मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झालेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 23, 2018, 03:11 PM IST
मुख्य सचिव मारहाण प्रकरणी पोलीस केजरीवालांच्या घरी title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्य सचिवांना झालेल्या मारहाणप्रकरणी चौकशी कऱण्यासाठी दिल्ली पोलीस मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झालेत. 

मुख्यमंत्री निवासस्थानातील कर्मचाऱ्यांकडं या मारहाणीची ते विचारपूस करतायत. 

सीसीटीव्ही फुटेजदेखील मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न

इथलं सीसीटीव्ही फुटेजदेखील मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मारहाण झाली होती.

आमदारावर मारहाण केल्याचा आरोप

आम आदमी पक्षाच्या आमदारांवर मारहाण केल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश असल्याने पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारी खाली येतात, त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.