मुंबई : काही वाहिन्यांनी अटलजींच्या बाबतीत खोडसाळपणा करत वृत्त दिलंय. वाजपेयींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पण काही वाहिन्यांनी उतावीळपणा करत चुकीचं वृत्त दिलंय. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी चुकीचे वृत्त दिल्यानंतर आता दूरदर्शनने माफी मागितली आहे. त्यानंतर दूरदर्शनच्या हवाल्याने अनेक माध्यमांनी चुकीचे वृत्त दाखविले. अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलंय. भाजपाचे ज्येष्ठ नेते त्यांना पाहण्यासाठी एम्स रूग्णालयात दाखल झालेयत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सुधारावी, यासाठी मुंबईतही होमहवन सुरू आहेत. बोरिवलीत भाजप नगरसेवक, कार्यकर्ते आणि मंदिर प्रशासन यांच्या वतीनं होमहवन सुरू आहे. वाजपेयींची प्रकृती लवकरात लवकर स्थिर व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
अटलजींची प्रकृती खालावल्यानं देशभरात चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृती पुन्हा ठिक व्हावी यासाठी सर्वत्र प्रार्थना सुरू आहेत. अटलजींनी लखनऊ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलंय. अटलजींचा मुक्काम लखनऊ असला की ते हमखास तिथल्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी येत असंत. तिथं आज सकाळपासून अनेक वाजपेयी समर्थक हनुमंताची प्रार्थना केलीय. तर भोपाळमधल्या दुर्गा मंदिरात अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी रुद्राभिषेक करण्यात आला.