ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना या लाईटकडे लक्ष द्या; अन्यथा खाते होणार रिकामं

ATM Cash Withdrawal | भारतात गेल्या काही दिवसांपासून एटीएमच्या माध्यमातून खाते रिकामं होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत

Updated: May 10, 2022, 11:23 AM IST
ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना या लाईटकडे लक्ष द्या; अन्यथा खाते होणार रिकामं title=

मुंबई : ATM Cash Withdrawal| भारतात गेल्या काही दिवसांपासून एटीएमच्या माध्यमातून खाते रिकामं होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तुम्हीही एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुमच्या एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, अशा परिस्थितीत ATM वापरताना काय काळजी घ्यायला हवी याबाबत पाहू या...

ATM Card Cloning : आजकाल प्रत्येकजण एटीएमचा वापर पैसे काढण्यासाठी करतो. पण एटीएममधून पैसे काढताना तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमध्ये, ऑनलाइन व्यवहार आणि एटीएममधून पैसे काढणे देखील सुरक्षित नाही. सायबर चोर खूप हुशार असतात, त्यामुळे एटीएममधून पैसे काढतांना काळजी घेणं गरजेचं आहे.

एटीएम क्लोनिंग म्हणजे काय?

तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल, तर एटीएम वापरल्यानंतर तुम्ही ते काळजीपूर्वक तपासले पाहिजे.  एटीएमच्या वापरातील सर्वात मोठा धोका कार्ड क्लोनिंगचा आहे. येथून तुमच्या कार्डचे डिटेल्स सहज काढले जातात आणि असे झाल्यास तुम्हाला सायबर फसवणूकीचा सामना करावा लागू शकतो. 

डिजिटल युगात हॅकर्सही खूप स्मार्ट झाले आहेत. हे हॅकर्स एटीएम मशिनमधील कार्ड स्लॉटमधून ग्राहकांचे बँकिंग डिटेल्स चोरतात. हे हॅकर्स एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये असे उपकरण ठेवतात, जे तुमच्या कार्डचे डिटेल्स स्कॅन करतात. या उपकरणाद्वारे आपले सर्व डिटेल्स त्या उपकरणामध्ये जतन केले जातात. त्यानंतर ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही वायरलेस उपकरणाच्या मदतीने हे हॅकर्स डेटा चोरतात.

काळजी कशी घ्यावी?

हॅकर्स कितीही हुशार असोत, पण तुम्ही सतर्क असाल तर तुमचे पैसेही सुरक्षित राहतील. तुमचे डेबिट कार्ड वापरण्याआधी हॅकरकडे तुमचा पिन क्रमांक असणे अनिवार्य आहे. मात्र, यासाठी हॅकर्सचीही एक पद्धत असते. ते कॅमेऱ्याने तुमचा पिन नंबर ट्रॅक करतात.  अशा स्थितीत जेव्हाही तुम्ही पिन क्रमांक टाकाल तेव्हा तो दुसऱ्या हाताने झाकून टाका.

पैसे काढण्यापूर्वी एटीएम चेक करा

  •  तुम्ही एटीएममध्ये गेल्यास आधी एटीएम मशीनचा कार्ड स्लॉट तपासावा.
  • एटीएम कार्डच्या स्लॉटमध्ये काही छेडछाड झाली असेल किंवा स्लॉट सैल असेल तर त्याचा वापर करू नका.
  • कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकताना त्यावरील 'ग्रीन लाइट'वर लक्ष ठेवा.
  • जर इथल्या स्लॉटमध्ये हिरवा दिवा असेल तर तुमचे एटीएम सुरक्षित आहे.
  • स्लॉटमध्ये कोणताही दिवा नसेल तर कोणत्याही स्थितीत एटीएम वापरू नका.